Maratha Reservation : पोटातले ओठावर आणताना यापुढे… राज ठाकरेंचा सरकारला सणसणीत टोला

Raj Thackeray On Eknath Shinde : जालन्यातील अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू केलेले उपोषण गुरुवारी मागे घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन जरांगेंनी उपोषण सोडले आहे. या उपोषणावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. दोन दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपण […]

Letsupp Image   2023 09 04T115654.559

Letsupp Image 2023 09 04T115654.559

Raj Thackeray On Eknath Shinde : जालन्यातील अंतरवाली सराटीतील मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू केलेले उपोषण गुरुवारी मागे घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळाचा रस घेऊन जरांगेंनी उपोषण सोडले आहे. या उपोषणावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. दोन दिवसांपूर्वीच एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपण बोलून निघून जायचे, असे म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या संवादावरून तिखट राजकीय प्रतिक्रिया येत आहे. राज ठाकरे यांनीही या वाक्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे. सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचे भान येऊन, पोटातले ओठावर आणताना या पुढे विचार करतील अशी आशा बाळगतो, असा टोलाही राज ठाकरेंनी (Raj Thackeray) शिंदेंना लगावला आहे.

राज ठाकरे यांनी एक ट्वीट केले आहे. राज ठाकरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील ह्यांचे मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होते. ते त्यांनी मागे घेतले, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरे झाले. पण हे उपोषण सोडविताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासने दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Maratha Reservation साठी नारायण राणेंनी सांगितला फॉर्म्युला, म्हणाले सरसकट कुणबी दाखले…

आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे. त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे, असा सल्लाही सरकारला राज ठाकरेंनी दिलाय.

Reservation : सलून बंद ठेवत आरक्षणाच्या मागणीसाठी नाभिक समाज एकवटला…

गेली १७, १८ दिवस महाराष्ट्रात जे घडले, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा, असे ठाकरेंनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Exit mobile version