Download App

पहिली ते दहावी मराठी अनिवार्य : राज ठाकरेंची मागणी अन् केसरकरांनी क्षणात घोषणाही केली

Raj Thackeray’s demand Dipak Kesarkars Announcement : पहिली ते दहावी मराठी अनिवार्य करा अशी मागणी राज ठाकरे ( Raj Thackeray’s) यांनी केली. त्यानंतर लगेचच शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी क्षणात माहिती दिली की, सर्व शाळांना यावर्षीपासून मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे. हे दोघेही मुंबईतील विश्व मराठी साहित्या संमेलनामध्ये बोलत होते.

धक्कादायक! आयटी हब हिंजवडीत इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या; परिसरात खळबळ

त्यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, मी राज ठाकरे यांचे या कार्यक्रमाला आल्याबद्दल आभार मानतो. त्याचबरोबर मला तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी सांगायचे आहे की, सर्व शाळांना यावर्षीपासून मराठी हा विषय अनिवार्य करण्यात आलेला आहे. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू असेल त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून नवीन शैक्षणिक धोरणानुसार मराठीमध्ये उच्च शिक्षण यावर्षीपासून देण्यासाठी सुरुवात करणार आहे. दरम्यान मंत्री दीपक केसरकर ही घोषणा करत असतानाच राज ठाकरे हे स्वतः पोडियम जवळ आले. त्यांनी थेट माईकवरून सांगितलं की, हे शिक्षण देत असताना शिक्षक चांगले ठेवा. नाहीतर पुढे गोंधळ होईल असा मिश्किल सल्ला राज ठाकरेंनी दिला.

“अधिसुचनेवर लाखो हरकती आल्या तरी..” : ओबीसी नेत्यांना चेकमेट करण्याचा जरांगेंनी सांगितला ‘प्लॅन’

आज 28 जानेवारीला नवी मुंबईमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाचा आयोजन करण्यात आला आहे. वाशीच्या सिडको प्रदर्शन केंद्रावर पुढील तीन दिवस हे संमेलन सुरू असणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संमेलनाला उपस्थिती लावली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले होते की, राज ठाकरे येतील तुमच्याशी बोलतील. अनेक विषय सुचवतील. मराठीला पुढे कसं न्यायच? हे सांगतील. पण मी आज तुमच्यासमोर उभा आहे. गेली अनेक वर्ष मराठी विषयावर बोलतोय. अंगावर केसेस घेतल्या आहेत. मराठी विषयासाठीच मी जेलमध्ये गेलो.

पार्थ पवार यांना त्या तीन चुकांची किंमत आजही मोजावी लागतेय…

मी आताही तेच सांगत होतो की, मी अत्यंत कडवट मराठी आहे. माझ्यावर संस्कारही त्याच प्रकारचे झाले आहेत. आजोबांचे पुस्तक रूपात झाले. बाळासाहेबांचे माझ्या वडिलांचे झाले आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचे झाले. महाराष्ट्र ही काय ताकद आहे? हे जसजसं समजत गेलं तस तसा मी आणखी तीच्या प्रेमात पडत गेलो.

जूनमध्ये मला अमेरिकेतील मराठी मंडळ आमंत्रण दिले. त्याचे अध्यक्ष मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की, आम्ही अमेरिकेत शंभर मराठी शाळा काढल्या आहेत. मात्र दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये मात्र मराठी शाळा बंद होताना दिसतात. त्याचबरोबर सीबीएससी शाळांमध्ये सर्रास हिंदी आणि इंग्रजीचा वापर केला जातो. त्यामुळे सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्यात यावी. अशी मागणी यावेळी राज ठाकरे यांनी केली होती.

follow us

वेब स्टोरीज