Download App

आयारामांना उमेदवारी अन् निष्ठावंतांनी सतरंज्याच उचलाव्या; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Nana Patole on BJP : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी महायुतीने चार उमेदवारांची घोषणा केली आहे. नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण (Ashok Chavhan) आणि शिंदे गटात गेलेले मिलिंद देवरा (Milind Devar) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यसभेची उमेदवारी आयात केलेल्या लोकांना देऊन कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपाने दिलेला आहे, अशी टीका केली आहे.

नाना पटोले यांनी ट्विट केले आहे की, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष व ‘विश्वगुरु’ असे नेतृत्व असल्याच्या वल्गणा करणाऱ्यांकडे राज्यसभेसाठी उमेदवार नसावा यातूनच भाजपा हा हवा भरलेला फुगा आहे तो कधीही फुटू शकतो हे दिसते. आयारामांना उमेदवारी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलणे हीच भाजपाची पद्धत आहे.

…तर मी पोलिसांना टायरमध्ये घालायला लावेन! अजितदादांची तंबी…

त्यांनी पुढं म्हटले की, राज्यसभेची उमेदवारी आयात केलेल्या लोकांना देऊन कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलाव्या हा संदेश भाजपाने दिलेला आहे. पक्ष वाढवण्यासाठी जे कार्यकर्ते आयुष्यभर मेहनत करतात त्यांना भाजपा संधी देत नाही. भिती दाखवून, दरोडे टाकून दुसऱ्या पक्षातील लोकांना भाजपात घेणे, दुसऱ्यांचे पक्ष फोडणे, चोरणे हेच काम भाजपा सध्या करत आहे.

उद्धव ठाकरेंना लोक हास्यजत्रा म्हणून एन्जॉय करतील; बावनकुळेंचे टीकास्त्र

भाजपामध्ये नेतेच नाहीत, कालपर्यंत ज्यांना ते ‘डिलर’ म्हणत होते त्यांनाच आता ‘लिडर’ म्हणण्याची वेळ भाजपावर आली आहे. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेऊन राज्यसभेची उमेदवारीही दिली हेच भाजपाचे पार्टी वीथ डिफरन्स आहे का ? असा सवाल उपस्थित करत भाजपाचे खायचे व दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

नानांनी मोदींवर आरोप करुन स्टंटबाजी केली होती; बावनकुळेंकडून शिळ्या कडीला ऊत

follow us