उद्धव ठाकरेंना लोक हास्यजत्रा म्हणून एन्जॉय करतील; बावनकुळेंचे टीकास्त्र
Chandrasekhar Bawankule on Uddhav Thackeray : ठाकरे गट आणि भाजप (BJP) यांच्याकडून सातत्याने एकमेकांवर टीका केली जातेय. उद्धव ठाकरे यांच्याकडून भाजप नेत्यांना जशास तसं उत्तर दिलं जातंय. आताही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) भाजप-मोदींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. देशात कोरोना नाही तर हुकुमशाहीचा व्हायरस तयार झाला. फडणवीस हे गृहमंत्री नाहीत ते तर घरफोडेमंत्री आहेत, अशी टीका ठाकरेंनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली.
नानांनी मोदींवर आरोप करुन स्टंटबाजी केली होती; बावनकुळेंकडून शिळ्या कडीला ऊत
आज बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. दरम्यान, ठाकरेंकडून होत असलेल्या टीकेविषयी विचारलं असता ते म्हणाले की, देवेंद्र हे उद्धव ठाकरेंच्या स्वप्नातही येत असतील. उद्धवजी जेवढं घरातल्या सदस्यांचं नाव घेत नाही, इतका देवेंद्रजींच्या नावाचा जप करत असतात. जर त्यांच्या हातात 108 मण्यांची मान दिलं तर ते दिवसभर फडणवीसांच्या नावाच जप करत बसलीत. सतत टीका करणं हे यातून त्यांची व्यथित मानसिकता झालेली दिसते.
काही दिवसांनी लोक त्यांना हास्यजत्रा म्हणून एन्जॉय करतील, असा टोला बावनकुळेंनी लगावला.
Paytm UPI,QR आणि Soundbox पूर्वीप्रमाणे वापरता येणार? कंपनीने दिली सविस्तर माहिती
ते पुढं म्हणाले की, उद्धवजीचं मुख्मंत्रीपद गेलं, मुलांचं मंत्रीपद गेलं. शिवाय पक्षही त्यांच्या हातून गेला. याचं त्यांना दु:ख आहे. पण, या दुखाचं खापर स्वता:वर न फोडता दुसऱ्यांवर फोडत आहे, स्वत:चं काय चुकलं याचाही त्यांना जरा विचार करावा, असं बावनकुळे म्हणाले.
अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. यावरून नाना पटोलेंनी भाजपवर टीका केली. चव्हाण यांनी मागं फिरावं, नाहीतर शेवटच्या रांगेत बसावं लागेल, असं म्हटलं होतं. यावरून बावनुकळेंनी नाना पटोलेंवरही टीका केली. ते म्हणाले, भाजपचे खासदार म्हणून पटोलेंनी काम केलेलं आहे. त्यांच्या जुन्या व्हिडिओत त्यांनी अनेकदा कॉंग्रेसवर टीका केली. कॉंग्रेसने देश कसा बुडवला, कॉंग्रेसमधील घराणेशाहीवर भाष्य केलं. नंतर स्टंटबाजी करून त्यांनी भाजप सोडली. मोदींवर टीका करून भाजप सोडला तर राहुल गांधींकडून मोठी जबाबदारी पदरात पडेल, म्हणून त्यांनी पक्ष सोडला होता, असं बावनकुळे म्हणाले.