नानांनी मोदींवर आरोप करुन स्टंटबाजी केली होती; बावनकुळेंकडून शिळ्या कडीला ऊत

नानांनी मोदींवर आरोप करुन स्टंटबाजी केली होती; बावनकुळेंकडून शिळ्या कडीला ऊत

Chandrashekhar Bawankule On Nana Patole : नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप करुन स्टंटबाजी करत भाजप सोडली असल्याचं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिळ्या कडीला ऊत आणला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्याकडून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. अशातच आता काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली होती. याच टीकेला बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पेटीएमला मोठा धक्का: पेटीएम पेमेंट्स बँकेची ईडीकडून चौकशी, शेअर्समध्ये घसरण

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलण्याचा अधिकार नाना पटोले यांना कोणी दिला आहे. मी नाना पटोलेंचे काही जुने व्हिडिओ काढत आहे त्यामध्ये नाना पटोले यांनी काँग्रेस किती बदमाश? किती खतरनाक? घराणेशाही कशी? देश कसा बुडवला? यावर वक्तव्ये केलेली व्हिडिओ बाहेर काढणार आहेत. हे व्हिडिओ मी माझ्या ट्विटरवर शेअरदेखील करणार आहे. नाना पटोले यांचा आणि भाजपचा मोठा प्रवास आहे, नानांनी मोदींवर आरोप करुन एक स्टंटबाजी करन भाजप सोडली. मोदींवर आरोप केल्याने राहुल गांधी चांगली संधी देतील असं वाटलं त्यांना त्यासाठीच त्यांनी स्टंट केला असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले?
अशोक चव्हाण यांना नेतृत्व करण्याची कायम इच्छा होती आणि त्यांना कॉंग्रेसमध्ये नेतृत्व करण्याची कायम संधी दिली. त्यांच्याबरोबरच्या रांगेमध्ये अनेक वरिष्ठ नेते होते. पण अशोक चव्हाण यांना एकदा नाही तर दोनदा मुख्यमंत्री केलं. पण आत्ता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माझा भाजपमध्ये थोडा अनुभव आहे. आत्ता त्यांना भाजपमध्ये मागच्या लाईनमध्ये बसावं लागणार आहे. त्यामुळे अद्यापही काही बिघडलेलं नाही. त्यामुळे आमची नम्र विनंती आहे की, त्यांनी आपला निर्णय मागे घेऊन त्यांनी पुन्हा कॉंग्रेसमध्येच यावं असं आवाहन नाना पटोले यांनी अशोक चव्हाण यांना केलं.

‘अशोक चव्हाण चौकीदार कसे होऊ शकतील?’ ठाकरे गटाचा मोदी सरकारला खोचक सवाल

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं समोर येत आहे. कारण भाजपकडून चौथा उमेदवार देण्यात येणार नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं आहे. त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून आत्तापर्यंत तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. तर शिवसेनेकडूनही राज्यसभेसाठी एका उमदेवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचा शिलेदार अद्याप ठरलेला नाही.

‘सदाशिव लोखंडेंनी शिर्डीतून पुन्हा उभं राहुन दाखवावंच’; उद्धव ठाकरेंनी दम भरला…

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्याचे महत्वाचे नेते अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. चव्हाणांसोबतच मेधा कुलकर्णी पुण्यात आमदार होत्या. कुलकर्णी भाजपच्या महिला राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यांनी त्याचं आयुष्य पक्षासाठी घालवलं आहे. त्यामुळे पक्षसंघटनेत कांम करणाऱ्यांना संधी मिळत आहे. त्यांचं अभिनंदन असून भाजपचे तीन खासदार आणि महायुतीचे इतर दोन खासदार राज्याचे प्रश्न संसदेत मांडतील खासदार हा मला विश्वास असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube