‘सदाशिव लोखंडेंनी शिर्डीतून पुन्हा उभं राहुन दाखवावंच’; उद्धव ठाकरेंनी दम भरला…

‘सदाशिव लोखंडेंनी शिर्डीतून पुन्हा उभं राहुन दाखवावंच’; उद्धव ठाकरेंनी दम भरला…

Udhav Thackeray On Sadashiv Lokhande : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यात येत आहे. दरम्यान, या यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभांमधून उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) सत्ताधाऱ्यांवर धारेवर धरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांनी शिर्डीतून पुन्हा उभं राहुन दाखवावंच, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी दमच भरला आहे. अहमदनगरमधील सोनईत आयोजित सभेत ते बोलत होते.

श्रेयस तळपदे- गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’? व्हॅलेंटाईन वीकमध्ये ट्रेलर प्रदर्शित

उद्धव ठाकरे म्हणाले, शिर्डीचे खासदार खासदार तर तिकडे शिंदे गटात पाणी भरण्यासाठी गेलेच आहेत. आता तुम्ही उभं राहुन दाखवाच नव्हे तर भाजपने भ्रष्ट नेते आमच्या उमेदवारांसमोर उभं करुन दाखवावंच, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचं नाव घेता दम भरला आहे. तसेच राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे हे सरकार करू शकत नाही. पिकविमा भरले मात्र, शेतकऱ्यांच्या हातात काही मिळाले नाही. जिथे जाऊ तिथे खाऊ असा मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांकडून घोटाळा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना असं वाटतं असेल की मोठे नेते फोडले की फायदा होईल हे तुम्हाला शोभत नाही. मोदी राज्याला देत काही नाही मात्र उद्योग धंदे इथून पळवून नेत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सनी लिओनी अन् डॅनियल वेबरची स्टार्टअप ‘राइज’मध्ये गुंतवणूक; सर्वांच्याच भुवया उंचावल्या

तसेच महाराष्ट्राची लुट करणारे हुकूमशहा हे राज्याला बरबाद करू राहिले . शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही मात्र गद्दारांना खोके मिळत आहेत. गद्दार भाजपात गेले की त्यांची रेकॉर्ड धुतली जातात . ज्यांनी कष्ट करून पक्ष उभारले आणि बाहेरुन आलेले उपरे तुमच्या डोक्यावर येऊन बसले आहेत , खासदार लोखंडे तुम्ही पुन्हा शिर्डीतून उभं राहून दाखवावंच, असा खुलेआम दम उद्धव ठाकरे यांनी भरला आहे.

कतारमध्ये फाशी सुनावलेल्या माजी नौसैनिकांची सुटका; मोदी सरकारच्या कूटनीतीला यश

शेतकऱ्यांमुळे मोदी दिल्लीत पोहचले. मात्र, याच शेतकऱ्यांना दिल्लीचा सीमेवर रोखलं जात आहे. शेतकऱ्यांना काही मागाल तर गोळ्या घालू असं हे सरकार आहे. शिवसेनेन भाजपला वीस-पंचवीस वर्ष साथ दिली मात्र ती वर्ष सडली. घरातील चुल पेटवणारं आपलं शिवसेनेचं हिंदुत्व तर घर पेटवणार भाजपचं हिंदुत्व असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

दरम्यान, खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेही पुन्हा या मतदारसंघातून मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी शिर्डीत एक मेळावा घेतला आहे. या मेळाव्यातही आठवले यांनी पुन्हा शिर्डीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही जागा आठवले यांच्यासाठी सोडल्यास पुन्हा भाऊसाहेब वाकचौरे व आठवले अशी लढत होऊ शकते. तर हा मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज