…तर मी पोलिसांना टायरमध्ये घालायला लावेन! अजितदादांची तंबी…

…तर मी पोलिसांना टायरमध्ये घालायला लावेन! अजितदादांची तंबी…

Ajit Pawar News : आगामी निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून कार्यकर्त्यांना जबरदस्त तंबीच देण्यात आली आहे. पोलिसांकडून मला समजलं की आपल्याच कार्यकर्त्यांची चूक, तर पोलिसांना टायरमध्ये घालायला लावेन, अशी तंबीच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे.

शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं, उद्या रेल्वेचा चक्का जाम, शेतकरी संघटना आक्रमक

अजित पवार म्हणाले, कोणाच्याही खासगी आयुष्यावर कुणीही बोलायंच नाही. कोणत्याही महिलेवर टीका करायची नाही. कोणालाही विनाकारण ट्रोल करु नका, जर आपल्याला कोणी बोलत असेल तर पोलिसांत तक्रार दाखल करा, कोणावरही कायदेशीर कारवाई करण्याची वेळ आली तर पक्षाकडून मदत केली जाणार आहे. अशावेळी मी पाठिशी काय उभं राहिन, पण जर पोलिसांनी सांगितल की कार्यकर्त्यांची चूक आहे तर पोलिसांनाच टायरमध्ये घालायला लावेन, आपल्याच पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी सर्व मदत पक्षाकडून करण्यात येणार असून वैद्यकीय अडचणीही सोडवल्या जाणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

वरूण धवन ते साकिब सलीम या अभिनेत्याची ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल ब्लॅक ड्रेस फॅशन, पाहा फोटो…

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पुढील काही दिवसांत निवडणूक होणार असून राजकीय दृष्ट्या कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया शिबिरात बोलताना सूचना जारी केल्या आहेत. सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी, याची नियमावलीच अजित पवार यांनी ठरवून दिली आहे.

द्रौपदी मुर्मूंच्या आधी मला राष्ट्रपतीपदाची ऑफर; आंबेडकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

दरम्यान, अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आपला फुले शाहु आंबेडकरांचा विचार आहे. आपला विचार सेक्यूलर असून हा विचार आपण कधीच सोडणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजाऊ आहेत, ही आमच्या पक्षाची भूमिका असल्याचं अजितदादांनी ठणकावून सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube