Ravi Rana on Udhhav Thackeray for Mithi River Fraud : मिठी नदी गाळ उपसा करण्याच्या प्रकरणात खोटे दस्तऐवज सादर करून केलेल्या फसवणुकीप्रकरणी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय प्रसिद्ध अभिनेता दिनो मोरिया (Dino Morea) याची चौकशी झाली. त्यानंतर आता आमदार रवी राणा यांनी आज झालेल्या बैठकीमध्ये या प्रकरणावर चौकशी केली जाईल. त्यावरून गुन्हे दाखल केले जातील असं म्हणत ठाकरे पिता-पुत्रांना इशारा दिला आहे.
काय म्हणाले आमदार रवी राणा?
ज्या पद्धतीने मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या प्रक्रीयेबाबत वारंवार पालिकेच्या माध्यमातून घोट्याळाचा आकडा समोर येतोय. त्यात उद्धव ठाकरे यांच्या काळात ५ कॉन्ट्रॅक्टर यांना दिलेले ते उघडकीस आलं आहे. तसेच पुन्हा-पुन्हा त्याच कॉन्ट्रॅक्टर्सना हे काम दिले गेल्याचं देखील आढळून आलेलं आहे. तर नदीतून काढलेला गाळ पुनः नदीत वाहून आलाय. त्यामुळे या प्रकरणी बांगर यांना अहवाल सादर करण्यासाठी सांगितले आहे. त्यानंतर नदीच कसे काम केले? याची चौकशी केली जाईल. त्यावरून गुन्हे दाखल केले जातील असं देखील राणा म्हणाले आहेत.
नको त्या व्यक्तीसोबत चॅट, फॉर्च्युनरसाठी वैष्णवीला कशाला छळू? राजेंद्र हगवणेच्या वकिलांचा युक्तिवाद
पुढे बोलताना राणा म्हणाले की, नागरिकांच्या पैशावर कॉन्ट्रॅक्टर आणि मातोश्री चालत असेल तर मुख्यमंत्री याच्याकडे याबाबत तक्रार करू. आदित्य ठाकरे यांनी जो घोटाळा झाला. त्याचे उत्तर द्यावे. ८ दिवसात अहवाल सादर होईल आणि त्यानंतर पहाणी दौरा होईल कारवाई होईल. १२ मिल आहेत त्यातील कमला मिल सारखं प्रकार आहे. अवैध वापर बार पब साठी वापर केलाय त्यासाठीचे अभ्यासक आणि कमिटी असेल. किमिटी च्या माध्यमातून कारवाई केली जाईल. ८० ते ९० जुन्या लिस्ट आहे ते रिलीव्ह झाले तर त्याचा फायदा पालिकेला होईल. असं देखील राणा म्हणाले आहेत.
नेमकं प्रकरणं काय आहे?
मिठी नदीत (Mithi River) झालेल्या गाळ उपसा प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. मुंबईतील मिठी नदीच्या गाळ उपसा प्रकरणी खोटे दस्तावेज सादर करून महापालिकेची 65 कोटींची फसवणूक झाल्याचे प्रकरण नुकतेच उघड झाले. यात अटक असलेल्या आरोपींनी दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सँतिनो मोरियाचे नाव आणि त्यांच्यातील संभाषणाचा उल्लेख केला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिनो मोरियाची चौकशी करून त्याला सोडले.