Ravindra Waikar Join Shivsena : कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीचा ससेमिरा मागे लागलेले ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, आज सायंकाळी वायकर यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष केला. त्यामुळं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला.
‘खंडोजी खोपडेची अवलाद…’; रवींद्र वायकरांचे नाव घेता ठाकरेंचे टीकास्त्र
वायकर हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबईतील जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं ठाकरे गटाला मोठा फटका बसू शकतो.
दरम्यान, पक्षप्रवेशाबाबत रवींद्र वायकर म्हणाले, मी गेली ५० वर्षे शिवसेनेत काम केले. बाळासाहेबांसोबत शिवसेनेत काम केले. त्या जोरावर मी ४ वेळा नगरसेवक आणि ३ वेळा आमदार झालो. पण इथं पक्षप्रवेश करण्याचं कारण वेगळं आहे. कोविडमध्ये कोणतेही काम झाले नाही. पण कामं व्हायला पाहिजेत.
बुडत्याचे पाय डोहाकडे, फडणवीसांमुळेचं मोदींचा करेक्ट कार्यक्रम होणार; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
आरेतील ४५ किमी रस्त्यासाठी १७३ कोटी रुपयांची गरज आहे. आरेतील रस्त्यांसाठी लोक रडत आहेत. याशिवाय काही भागात पाण्याची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीत जनतेसाठी धोरणात्मक निर्णय बदलले पाहिजेत. हे बदलले नाही तर लोकांना न्याय देऊ शकत नाही. पीएमजीपी कॉलनी, सर्वोदय नगर अशा अनेक ठिकाणचे प्रश्न आहेत. या सर्वांच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय सत्तेत राहिल्याशिवाय घेता येत नाहीत.
वायकर पुढे म्हणाले, लोक काम करण्यासाठी निवडून देतात. त्यामुळं सध्या देशात मोदींची सत्ता आहे. ते चांगला कारभार पाहत आहे. येथे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत तातडीन निर्णय घेतात. माझीही कामं तातडीने मंजूर करतील, अशी मला आशा आहे. हे प्रश्न सोडवण्यासाटी मी प्रामुख्याने इथं आलो आहे. हे प्रश्न सोडवले नाहीत तर मी लोकांसमोर जाऊ शकत नाही, त्यामुळं इथं आलो आहे, असं वायकर म्हणाले.
कोण आहेत रवींद्र वायकर?
रवींद्र वायकर यांनी 20 वर्षे मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून काम केले आहे. 1992 मध्ये ते मुंबईतील जोगेश्वरी भागातून महापालिकेवर पहिल्यांदा निवडून आले होते. 2006-2010 दरम्यान, वायकर यांनी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये तीन वेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये त्यांनी गृहनिर्माण आणि उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर वायकर 2019 च्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण खात्याचे राज्यमंत्री होते.