Download App

मोठी बातमी! आरबीआयकडून न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी, ठेवीदारांच्या पैशांच काय होणार?

  • Written By: Last Updated:

RBI Restricts New India Co-operative Bank : बँकिंग क्षेत्र नियामक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईस्थित न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह सहकारी बँकेवर (New India Co-operative Bank) बंदी घातली आहे. त्यामुळं या बँकेतून कोणताही ग्राहक आपल्या कष्टाचे पैसे काढू शकणार नाही. पुढील सहा महिन्यांसाठी ही बंदी लागू असणार असल्याची माहिती आरबीआयने दिली.

लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील म्हणून… मी महाकुंभमेळ्यात गंगेत स्नान केलं नाही; सुनील राऊत 

13 फेब्रुवारी 2025 रोजी बँकेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्याने आरबीआयने ही बंदी घातली आहे. आरबीआयने पुढील 6 महिन्यांसाठी बँकेतील सर्व अनावश्यक कामांवर बंदी घातली आहे. बॅंकेची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने सांगितलं. आरबीआयच्या या कारवाईमुळं आता ना बँकेला कोणता व्यवहार करता येणार, ना ग्राहकांना पैसे जमाण किंवा काढता येणार आहेत. त्यामुळं बॅंकेवर झालेल्या या कारवाईमुळं खातेदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

आरबीआयने सहकारी बँकेला कोणतीही गुंतवणूक करू नये किंवा कर्ज घेऊ नये असे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांसाठी सुखदवार्ता…रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू…पालकमंत्र्यांनी दिले आदेश 

परवाना रद्द झालेला नाही
दरम्यान, आरबीआयन न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या केवळ व्यवहारांवर बंदी घातली आहे. बँकेचा परवाना अद्याप रद्द केला नाही. आरबीआयने म्हटले अलिकडच्या काळात बँकेने केलेल्या काही अनियमिततेमुळे ग्राहकांच्या सुरक्षिचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत असून बँकेच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहे. आवश्यकतेनुसार पुढील कार्यवाही केला जाईल.

आरबीआयकडून बँकेवर कारवाई का केली?
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गेल्या २ आर्थिक वर्षांपासून तोट्यात आहे. बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, मार्च २०२४ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला २२७.८ दशलक्ष रुपये आणि २०२३ मध्ये ३०७.५ दशलक्ष रुपये तोटा झाला. बॅंकेचे आगाऊ कर्ज ३१ मार्च २०२४ पर्यंत ११.७५ अब्ज रुपयांवर घसरले, जे एका वर्षापूर्वी १३.३० अब्ज रुपये होते. त्याच वेळी, या कालावधीत बँकेतील एकूण ठेवी २४.०६ अब्ज रुपयांवरून २४.३६ अब्ज रुपयांपर्यंत वाढल्या.

दरम्यान, यापूर्वी २०१९ च्या सुरुवातीला, आरबीआयने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर आर्थिक अनियमिततेमुळे बंदी घातली होती.

follow us