Download App

IIFL Finance : आरबीआयचा IIFL फायनान्सला मोठा दिलासा; गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागं

भारतीय रिझर्व्ह बँकेने (दि. 19 सप्टेंबर 2024) रोजी IIFL फायनान्स लिमिटेडच्या गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी उठवण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:

RBI On IIFL Finance : बँकिंग क्षेत्रातील नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (IIFL)फायनान्सला मोठा दिलासा दिला आहे. आरबीआयने (IIFLFinance)च्या गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी मागं घेतली आहे. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजकडं नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

PM Vishwakarma Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्ध्यात; PM विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा

IIFL फायनान्सने स्टॉक एक्स्चेंजकडे नियामक फाइलिंगमध्ये म्हटलं आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने (दि. 19 सप्टेंबर 2024) रोजी IIFL फायनान्स लिमिटेडच्या गोल्ड लोन व्यवसायावरील बंदी उठवण्यात आली आहे. 4 मार्च 2024 रोजी, आरबीआयने IIFL फायनान्सला गोल्ड लोन मंजूर करण्यावर, वितरण किंवा विक्री करण्यावर बंदी घातली होती.

कंपनीने एक्सचेंजला सांगितले की आरबीआयचा हा निर्णय ताबडतोब लागू झाला आहे. नियमांनुसार, कंपनीला गोल्ड लोन मंजूर करणं, वितरण, असाइनमेंट, सिक्युरिटायझेशन आणि सोन्याच्या कर्जाची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आरबीआयने बंदी का घातली होती?

4 मार्च 2024 रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकेने IIFL फायनान्सला गोल्ड लोन मंजूर आणि वितरणावर बंदी घातली होती. कंपनीला विद्यमान गोल्ड लोन पोर्टफोलिओ सुरू ठेवून संकलन आणि वसुली प्रक्रिया सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली.
आयआयएफएलच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओमध्ये कर्ज मंजूर करताना आरबीआयला सोन्याची शुद्धता आणि वजन यामध्ये गंभीर अनियमितता आढळून आली होती.

BRICS मध्ये पाकिस्तानची एन्ट्री? भारताचा मित्र रशियाच करतोय मदत; प्लॅनही रेडी..

शेअर्समध्ये मोठी घसरण

आरबीआयला कर्जाच्या गुणोत्तरामध्येही तफावत आढळून आली होती. त्यानंतर कंपनीवर ही कारवाई करण्यात आली होती. आरबीआयने बंदी घातल्यानंतर आयआयएफएलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. आता आरबीआयने बंदी मागे घेतल्यानंतर पुन्हा कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

follow us