HDFC Bank : देशाची सर्वात मोठी बँक आरबीआयने (RBI) मोठी कारवाई करत ॲक्सिस बँक (Axis Bank) आणि HDFC बँकेला (HDFC Bank) ला तब्बल 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई केली आहे.
माहितीनुसार, आरबीआयने ॲक्सिस बँकेला 1.91 कोटी आणि एचडीएफसी बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ॲक्सिस बँकेने बँकिंग नियमन कायद्यातील काही तरतुदींचे उल्लंघन, ठेवीवरील व्याज दर, केवायसी आणि कृषी कर्ज नियमांचे पालन न केल्याने आरबीआयने 1.91 लाख रुपयांचा दंड ॲक्सिस बँकेला ठोठावला आहे.
तर दुसरीकडे एचडीएफसी बँकेनेही काही नियम न पाळल्याने आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे. ‘ठेवीवरील व्याजदर, बँकांमधील रिकव्हरी एजंट आणि बँकांमधील ग्राहक सेवा यावरील काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने एचडीएफसी बँकेला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. अशी माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.
5000 सायबर कमांडो तयार होणार, वाढणार सुरक्षा, अमित शहांचा मोठा निर्णय
ग्राहकांवर परिणाम होणार नाही
आरबीआयच्या या कारवाईचा कोणताही परिणाम ग्राहकांवर होणार नसल्याची माहिती देखील आरबीआयकडून देण्यात आली आहे. बँकिंग व्यवस्थेत शिस्त राखण्यासाठी आरबीआयने एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार हा दंड बँकांना नियमांचे पालन करण्यास आणि ग्राहकांच्या हिताची काळजी घेण्यास प्रेरित करते.
ब्रेकिंग! दिल्लीत भूकंपाचे धक्के; लोकांची पळापळ अन् घबराट