Download App

‘त्या’ दिवशी बारमध्ये मी एकमेव मुलगी होते, संजय राऊतांच्या आरोपांवर मोहित कंबोज यांच्या पत्नीकडून उत्तर

  • Written By: Last Updated:

“शनिवारी रात्री रेडिओ बारमध्ये मोहित कंबोज भारतीय सोबत मी एकमेव मुलगी होते, कोण काय म्हणत आहे याने फरक पडत नाही.” शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना मोहित कंबोज यांच्या पत्नी अक्षा कंबोज यांनी उत्तर दिल आहे. देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मोहित कंबोज रात्री ३ वाजता बारमध्ये मुलींना घेऊन नाचत आहेत, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. असा आरोप संजय राऊत यांनी केला होता, त्याला अक्षा कंबोज यांनी उत्तर दिलं आहे.

काल संजय राऊत यांनी संभाजी ब्रिगेड संघटनाप्रमुख सचिन कांबळे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करून थेट देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता. संजय राऊत यांनी शेअर केलेलय व्हिडीओमध्ये सचिन कांबळे मोहित कंबोज यांच्याबाबत दावा करत आहेत. “लिंक रोड खार पश्चिम येथील रेडिओ बार येथे देवेंद्र फडणवीस यांचे खास मोहित कंबोज मुलींना घेऊन नाचत आहेत, धिंगाणा घालत आहेत. बेधुंद अवस्थेत, नशा करून ते मुलींसोबत नाचत आहेत” असा दावा कांबळे यांनी या व्हिडीओ मध्ये केला आहे.

घोटाळा करुन सत्तेत आलेले बोलताना घोटाळा करतात; अजित दादांचा एकनाथ शिंदेंना टोला

याच व्हिडिओमध्ये ते पुढे असं म्हणतात की, “आमच्या सभा साडेदहा वाजताच बंद करता आणि मग यांना साडेतीन वाजेपर्यंत मुलीसोबत कसे नाचू शकतात”, असा थेट सवालही कांबळे यावेळी विचारत आहेत.

यासोबत राऊत यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. त्याच ते म्हणतात  “महाराष्ट्राचे गृहमंत्री कोणाच्या खिशात आहेत? शेवट पर्यंत पहा. पोलिस हतबल आहेत..हे तर काहीच नाही.” असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी या ट्विटसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात काही लोक पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत आहेत.

https://twitter.com/akshakamboj/status/1653229796909015040

संजय राऊत यांच्या या आरोपावर मोहित कंबोज उत्तर देणार आहेत, पण त्या आधी कंबोज यांच्या पत्नी अक्षा कंबोज यांनी देखील उत्तर दिल आहे. अक्षा कंबोज यांनी एक ट्विट केलं आहे, त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “कौटुंबिक मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी शनिवारी रात्री रेडिओ बारमध्ये मोहित कंबोज भारतीय सोबत मी एकमेव मुलगी होते, कोण काय म्हणत आहे याने फरक पडत नाही. खोट्या कथा टिकणार नाहीत!” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Mohit Kamboj : राऊतांच्या ‘त्या’ आरोपांनंतर आज कंबोज पत्रकार परिषद घेणार

Tags

follow us