Road Accident : भिवंडी-वाडा रस्त्यावर खड्ड्यांमुळे एका 22 वर्षीय तरूणाचा दुचाकीवर प्रवास करत असताना अपघात झाला. या अपघातामध्ये दुर्दैवैने या तरूणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रस्त्याच्या संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश जयराम जाधव अस या मृत तरूणाचं नाव आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यात उपचारादरम्यान त्याचा 3 सप्टेंबरला मृत्यू झाला.
त्यानंतर गुरूवारी याप्रकरणी रस्त्याच्या संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली की, 31 ऑगस्ट रोजी आकाश जयराम जाधव हा तरूण दुचाकीवरून जात होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा मित्र सूरज हेनबडे हा देखील होता. त्यावेळी त्यांची मोटारसायकल खड्ड्यात पडली. यामध्ये आकाशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यात उपचारादरम्यान त्याचा 3 सप्टेंबरला मृत्यू झाला.
केएल राहुल पूर्णपणे फिट, पाकिस्तानविरुद्ध इशान की राहुल? रोहितसमोर पेच
या प्रकरणी त्याच्या वडीलांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. जिजाऊ कन्स्ट्रक्शन्स रोड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र या रस्त्याचे काम खराब दर्ज्यांचे करण्यात आले आहे. त्यामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यन रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राज्यात आणि देशात अनेक मोठे अपघात घडतात. त्यात लोक मरण पावतात. मात्र त्याची दखल घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे आता या प्रकरणात देईखल अशी कारवाई होती की, नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.