छगन भुजबळांच्या पुतण्याकडे मुंबईची जबाबदारी, नवाब मलिकांना धक्का

Sameer Bhujbal : राष्ट्रवादीत दोन गट तयार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आहेत. मात्र मुंबईच्या अध्यक्षपदी नवाब मलिक कायम होते. आता अजित पवार गटाने नवीन अध्यक्षाची निवड जाहीर केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे झालेल्या […]

Sameer Bhujbal

Sameer Bhujbal

Sameer Bhujbal : राष्ट्रवादीत दोन गट तयार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आहेत. मात्र मुंबईच्या अध्यक्षपदी नवाब मलिक कायम होते. आता अजित पवार गटाने नवीन अध्यक्षाची निवड जाहीर केली आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे झालेल्या बैठकीत मुंबईच्या अध्यक्षपदी समीर भुजबळ यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

‘…तर अधिकाऱ्यांचे हात-पाय तोडू’; बच्चू कडूंचा धमकीवजा इशारा…

राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक होते. महाविकास आघाडीचे सरकार असताना मनी लॉंड्रिंग प्रकरणात जेलमध्ये गेले होते. त्यानंतरही त्यांच्याकडे हे पद कायम होते. काही दिवसांपूर्वी ते जामीनावर कारागृहातून बाहेर आले आहेत. त्यानंतर तोपर्यंत राष्ट्रवादीत दोन गट पडले होते. त्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांनी त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. पण नवाब मलिक यांनी भूमिका जाहीर केली नव्हती.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची 100 एकरात जाहीर सभा, पुढचं प्लॅनिंग काय?

आज राष्ट्रवादीच्या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्याकडे मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे छगन भुजबळ यांनी केलेल्या बंडाचे अजित पवार यांनी बक्षिस दिल्याचे बोलले जात आहे. समीर भुजबळ गेल्या काही दिवसांपासून सक्रीय राजकारणात नव्हते. पण पडद्यामागे राहून महत्त्वाची भूमिका पार पाडत होते.

Exit mobile version