Sanjay Raut on Sanjay Shirsat : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या मुलाच्या जीवनातील कौटुंबिक वादळ काल शांत झालं. सिद्धांत शिरसाट यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप करणाऱ्या महिलेने कालच सर्व आरोप मागे घेतले. यानंतर राजकीय वर्तुळातील टीका टिप्पणी थांबली असली तरी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दुसऱ्या एका प्रकरणाचा गौप्यस्फोट केला आहे. सिद्धांत शिरसाट यांच्या कमाईचं साधन काय? त्यांच्याकडे महागडी मालमत्ता खरेदीसाठी इतका पैसा आला कुठून? असे सवाल संजय राऊत यांनी केले आहेत.
संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिरसाट पित्रापुत्रांवर घणाघाती टीका केली. राऊत पुढे म्हणाले, हे कौटुंबिक विषय असतात. त्याच्यामध्ये आमच्यासारख्या नेत्याने पडू नये. त्यासाठी महिला आयोग आहे. महिला आघाडी आहे. त्यांनी त्याच्याविषयी बोललं पाहिजे. मी स्वतः कधी कोणाच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक विषयावर बोलत नाही आणि बोलू नये.
पण तुम्ही ज्या मंत्र्यांचे नाव घेतले संजय शिरसाट आणि त्यांचे चिरंजीव त्यापेक्षा भयंकर प्रकरण आहे. या महाशयांनी संभाजीनगरमधील वेदांत हॉटेल आणि त्याची प्रॉपर्टी प्रकरण आहे. अत्यल्प मूल्यावर प्रॉपर्टी ताब्यात घेतली. ही संपूर्ण प्रॉपर्टी सिद्धांत शिरसाट यांनाच मिळावी यासाठी सरकारने लिलाव प्रक्रिया राबवली गेली. एका मंत्र्याच्या मुलाकडे 67 कोटी रुपये आहेत. जो सामाजिक न्याय विभागाचा मंत्री आहे. 67 कोटी रुपयांनी हॉटेलची मालमत्ता विकत घेतली गेली. मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत मालमत्ता मिळावी यासाठी लिलाव प्रक्रिया बेकायदेशीर पद्धतीने राबवण्यात आली. निविदा भरणाऱ्या लोकांना कमी रक्कम भरायला लावली असा आरोप संजय राऊत यांनी केला.
हात धुवून मागे लागा, अजितदादाचं तक्रार घेऊन आले पाहिजेत; शाहंच्या कानमंत्राने भुवया उंचावल्या
एका मंत्र्याचा मुलगा महान नाही. त्याला काही आगापिछा नाही. उद्योग क्षेत्रात त्याचं नावही नाही. पण संभाजीनगरात प्राईम लोकेशनची मालमत्ता विकत घेतली जाते. कुठून आले पैसे. कोणत्या टेंडरींगमधून आले. कोणत्या दलालीतून आले. एकनाथ शिंदेंनी दिले की अमित शाहांनी दिले असे सवाल संजय राऊत यांनी विचारले.
खासदार नारायण राणे यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना पाकिस्तानात पाठवा असे म्हटले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, माझा असा प्रश्न आहे की राणे यांना पाकिस्तानात कोणाला पाठवायचं हे आम्ही भविष्यात ठरवूच. पण तुमचे मोदी यांनी पाकिस्तान विरोधात दंड थोपटले होते, ते दंड पिचके आहेत का? प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दम भरताच पाकिस्तानात घुसलेल्या सैन्याला माघारी का बोलावलं? ते आधी नारायण राणेंनी स्पष्ट करावं
ऑपरेशन सिंदूर जे चालवलं आणि पाकिस्तान पाक व्याप्त कश्मीर आता आम्ही ताब्यात घेणार अशी गर्जना भाजपवाल्यांनी केली, मोदींनी केली त्याचं काय झालं? याचं उत्तर त्यांनी द्यावं. पाकिस्तानात तुम्हाला पाठवायचं की, मोदींना पाठवायचं? नरेंद्र मोदी नवाब शरीफचा केक कापायला गेले. बहुतेक राणे विसरलेले दिसत आहेत. नवाब शरीफचा केक कापायला कोण गेलं तर त्यांचे नरेंद्र मोदी गेले. मिस्टर राणे आम्ही नाही गेलो कधी असा टोला राऊत यांनी राणेंना लगावला.
फडणवीसांनीही मदत केली नाही; भाजप नेते परिणय फुकेंच्या भावजयीने उघड केले खळबळजनक पत्ते