Download App

शिवसेनेचा निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही, संजय राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल

Sanjay Raut : शिवसेना आमदार अपात्रता निकालाविरोधात (MLA Disqualification) ठाकरे गटाने वरळीत महापत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राहुल नार्वेकर (RAHUL NARVEKAR) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. लवादाने दिलेला निकाल त्यांची बायकोही मान्य करणार नाही, असे म्हटले आहे.

संजय राऊत म्हणाले की आमदार अपात्रतेचा निकाल दिल्यानंतर लवाद असलेल्या राहुल नार्वेकर यांच्या अंत्ययात्रा निघाल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही मागचा पुढचा विचार न करता चोर आणि लफंग्याचा हातात लवादाने दिली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र खदखदतोय. या लवादाने दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही, अशा प्रकारचा निर्णय आहे, असा हल्लबोल संजय राऊत यांनी केला.

अशाप्रकारे बेईमानांना न्यायालयात न्याय मिळत गेला तर न्यायालयात कोणी जाणार नाही. जनता न्यायालय जो निकाल देईल तोच न्याय आणि निकाल चार महिन्यांनंतर होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

आताच्या खासदारांनी उसणं फेडावं, आम्हाला आमचं शेत द्यावं; हातकणंगलेसाठी सदाभाऊंनी ठोकला शड्डू

राज्याचे मुख्यमंत्री दाढीला पिळ देत सांगत असतात, कर नाही त्याला डर कशाला. कर नाही, डर नाही म्हणूनच आम्ही जनता न्यायालय घेण्याची हिंमत आम्ही दाखवली आहे. आमच्यात हिंमत आहे. आमच्याकडून काही चुकीचे झाले नाही. आम्ही कायद्याचे पालन केले आहे. न्यायालयात उत्तम लढाई लढलेली आहे. आम्ही ईमानदारीने लढतोत आणि तुम्ही बेईमानीने जिंकलात. त्यामुळे जनता न्यायालय घेतलं आहे.

काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल दिला. यामध्ये दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र घोषित करण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना अधिकृत आणि त्यांचा व्हिप ठाकरे गटाला देखील लागू होईल असा निकाल दिला होता. याविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

follow us