Download App

Pune Accident: पुणे अपघातप्रकरणी संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल; म्हणाले, ‘भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि…’

Sanjay Raut On Pune Police: पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ( Pune Accident) बडतर्फ केलं पाहिजे, असंही संजय राऊत (Sanjay Raut ) म्हणाले.

Sanjay Raut On Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना चिरडले. यामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला आहे. (Pune Accident ) दरम्यान, त्यातील आरोपीला काही वेळातच जामीन मिळाल्याने पोलिसांवर वेगवेगळे आरोप होत आहेत. आता पुणे अपघातप्रकरणी यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

कल्याणीनगर परिसरात घडलेल्या अपघातावरून पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ केलं पाहिजे. पोलीस आयुक्त नेमकं कोणाला मदत करतात? बिल्डरांचा मुलगा दारू पिताना दिसतोय बारमध्ये, त्याचे व्हिडिओ देखील बाहेर आले आहेत. त्याचे तुम्ही रिपोर्ट काय देतात? कोणी केलं हे सर्व? भ्रष्ट पोलीस आयुक्त आणि एक आमदार पुण्यातील, भ्रष्ट जनतेने या संदर्भात पोलीस आयुक्त यांच्या विरोधात आंदोलन केले पाहिजे, असे यावेळी संजय राऊत म्हणाले.

पुढे म्हणाले की, अजित पवार गटाचे आमदार आहे, माणुसकी शून्य आहे. मेडिकल रिपोर्ट देखील खोटा आलेला आहे. त्यांच्या पालकांवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. असे आयुक्त पुण्याला लाभले असतील तर पुण्याला कलंक आहे. पोलीस आयुक्त आणि न्यायालयाने दोन आखे बारा सिनेमा चालू केला आहे का? हा सर्व पैशाचा खेळ आहे. हा प्रकार म्हणजे मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार आहे.

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात मुंबईसह नाशिक आणि आसपासच्या मतदारसंघात चुरश पाहायला मिळाली आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात 13 जागांसाठी मतदान झाले. यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक या महत्त्वाच्या शहरांचा सहभाग होता. मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक उत्साहाने घराबाहेर पडले. भर उन्हात उभं राहूनही त्यांनी मतदान केलं. मात्र मतदान प्रक्रिया अत्यंत संथगतीने झाल्याचा आरोप संजय राऊतांनी निवडणूक आयोगासह भाजपवर केला आहे. निवडणूक आयोग भाजपची चाकरी करत असल्याचा खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे.

आमच्यावर दबाव नाही! दुर्दैवाने कोर्टाने दोन अर्ज फेटाळले; पुणे अपघातावर आयुक्तांची प्रतिक्रिया

अत्यंत कासवगतीने मतदान प्रक्रिया राबवा. जिथे महाविकास आघाडीची सरशी होऊ शकते अशी. विधानसभा क्षेत्रात, लोकसभा अशा ठिकाणी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल अशी कोणती स्ट्रॅटर्जी निर्माण केली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मला इथे प्रांतीय किंवा जातीवाद करायचा नाही. मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होण्याची शक्यता होती. मात्र, तरी देखील मतदान झाले आहे. त्या ठिकाणी मतदान यंत्रणा बिघडवून ठेवण्यात आली होती.

एका मतदाराला दहा ते पंधरा मिनिटं लागत असल्याचं उघडकीस आलं आहे. मुंब्रातील एका मतदारसंघांमध्ये एका तासांमध्ये फक्त 11 लोकांनीच मतदान केले. मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप भारतीय जनता पार्टी आणि मिंधे गट करत होते. त्यांच्यामध्ये पराभवाची भीती आहे, हे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणलं आहे. निवडणूक आयोग मतदारांना रोज दहा वेळेस मतदान करण्यासाठी आवाहन करत होत. आम्ही कुठल्याही पद्धतीचा संभ्रम निर्माण केला नाही. त्यांनी राज्यघटना आणि आचारसंहिता पुन्हा एकदा वाचणे गरजेच आहे, अशा तिखट शब्दात आशिष शेलारांना सुनावलं आहे.

follow us