Download App

BMC Covid Scam : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांसह एकाला ईडीकडून अटक

ED Arrest Sujit Patakar :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. कोविड घोटाळ्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. डॉ. किशोर बिचुले व सुजित पाटकर हे दोघे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांना कोविड घोटळ्या प्रकरणी ईडीने अटक केली आहे.

नेमके आरोप काय?

जम्बो कोविड सेंटर चालविण्यासाठी काही खासगी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती. ज्यामध्ये लाईफलाईन नावाची एक कंपनी होती. ही कंपनी सुजित पाटकर यांची असल्याचा ईडीचा आरोप आहे. या कंपनीने कोविड सेंटर चालविण्याचे कंत्राट घेतले होते. या कंपनीने जे डॉक्टर्स पेपरवर दाखविले होते तसेच जी यंत्रणा दाखवली होती ती अस्तित्वातच नव्हती असे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

डॉ. किशोर बिचुले हे बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे इन्चार्ज होते. यांच्यावर आरोप असा आहे की, जी डॉक्टर्स किंवा नर्स इथे काम करत नव्हते. त्यांचे बिल्स लाईफलाईन मॅनेजमेंटमार्फत  मुंबई महापालिकेला देण्यात आले. त्यानंतर महापालिकेकडून ती बिल्स देण्यात आली. डॉ. किशोर यांच्याकडून खोटे बिल्स तयार करण्यात आले व ते महापालिकेकडून घेण्यात आले. त्यानंतर आता या दोघांना अटक केली असून आता त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

बीएमसी कोविड घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं. आज याप्रकरणी ईडीनं मुंबईत तब्बल 15 ठिकाणी छापेमारी केली होती. या आरोपांना संजय राऊत यांनी ते माझे फक्त मित्र असल्याचं म्हटलं होतं.

Raigad Landslide : क्षणात होत्याचं नव्हतं झालं.. इर्शाळवाडीवर कोसळला दुःखाचा डोंगर

ईडीच्या चौकशीत सुजीत पाटकरांच्या घरी अलिबागच्या जमिनीच्या व्यवहाराचे पेपर मिळाले होते. ज्या व्यवहारात पाटकरांची पत्नी आणि वर्षा राऊतांची नावं होती. लाईफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये मी भागीदारांपैकी एक आहे. परंतु कंपनी डॉ. हेमंत गुप्ता यांच्या मालकीची आहे आणि वरळी येथील त्यांच्या क्लिनिकच्या नावावर ती नोंदणीकृत आहे, असं सुजित पाटकर म्हणाले होते.

 

Tags

follow us