छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्व आमदार आणि नगरसेवकांनी (Shivsena) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील नंदनवन या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. या भेटीसाठी छत्रपती संभाजीनगरचे सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये शहरातील प्रमुख आमदार आणि नगरसेवकांचा समावेश होता.
या बैठकीत आमदार संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ हे प्रमुख नेते देखील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांच्या नंदनवन निवासस्थानी शहरातील सर्व आमदार आणि नगरसेवक पोहोचले होते. ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे, ज्यात शहरातील लोकप्रतिनिधींनी थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. शिरसाट आणि जंजाळ यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतरची ही पहिलीच भेट असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मंत्रालयातच लाचकांड; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश, लिपिकाची प्रतिनियुक्ती रद्द
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नांदेड जिल्ह्यातील माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे व त्यांच्या समर्थकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. तसंच, संभाजीनगर जिल्ह्यातील उबाठाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आम्ही डावे उजवे सगळे पाहिले आहे. मात्र, दिलदार मनाचा एकमेव नेता एकनाथ शिंदे आहेत. म्हणून आम्ही आज शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत, असं शंकर धोंडगे यांनी यावेळी म्हटलं.
एकनाथ शिंदे पक्षप्रवेशावर बोलताना म्हटले की, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्यामध्ये आज शंकर धोंडगेदेखील आपल्यासोबत आले आहेत. आपण सर्वजण एका विश्वासाने आला आहात. कार्यकर्त्यांच्या मागं उभा राहणारा नेता अशी आपण ओळख करुन दिली. या पक्षात कोणी मालक नाही, चालक नाही. जो काम करेल तो पुढे जाईल, शेवटी कार्यकर्ता हाच पक्षाचा पाठीचा कणा असतो. आपण सर्वजण योग्य पक्षात आला आहात, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी शंकर धोंडगेंचं पक्षात स्वागत केलं.
