सेबीकडून ट्रेडिंग गुरूवर कारवाई! 546 कोटींची सर्वांत मोठी जप्ती करण्यात आलेले अवधूत साठे नेमके कोण?

Avdhoot Sathe सेबीने शेअर बाजारातून सामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्या अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी संस्थापकावर बंदी घातली आहे.

Avdhoot Sathe

Avdhoot Sathe

SEBI takes action against trading guru Avdhoot Sathe person whose assets worth Rs 546 crore seized : सेबीने शेअर बाजारातून सामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. यामध्ये अवधूत साठे या ट्रेडिंग अकॅडमी संस्थापकावर सिक्युरिटी मार्केटमधून बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे 546 कोटी रुपये जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. भारतातील कोणत्याही वित्तीय कंपनीकडून सेबीकडून जप्त करण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. मात्र हे अवधूत साठे नेमके कोण जाणून घेऊ…

मोदींशी गळाभेट ते एकाच गाडीतून प्रवास; पुतीन यांच्या भारत दौऱ्याचे खास फोटो नक्की पाहा

त्याचबरोबर साठे यांच्या गुंतवणूक सल्लागार म्हणून आणि संशोधन विश्लेषक म्हणून देण्यात येणाऱ्या सेवांवरही बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणावर सेबीने 125 पानांचा एक आदेश जारी केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, नोंदणीकृत नसलेल्या गुंतवणूक सल्लागार यांच्याकडून गोळा करण्यात आलेल्या पैशांमुळे हजारो किरकोळ गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यात आलेली आहे.

कर्जदारांना दिलासा! RBI कडून व्याजदर कपात; रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय

सेबीने पुढे म्हटले आहे की, त्यांच्या दोन्हीही संस्थांनी अंदाजे 3.4 लाख गुंतवणूकदारांकडून 601 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी घेतला आहे. तसेच ते गुंतवणुकीचे सल्ले स्टॉक विश्लेषण देऊन दिशाभूल करायचे, शेअर्स खरेदी-विक्री करायला प्रोत्साहित करायचे. शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचे असेल तर कायद्याचे पूर्णपणे पालन करावे लागते. असेही सेबीने म्हटले आहे. या अगोदर 2023-24 मध्ये अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी आणि अवधूत साठे यांच्या कारवायांची चौकशी करण्यात आली होती. ज्यामध्ये साठे यांच्या दोन्हीही संस्था सातत्याने नफा कमवतात त्या मात्र त्यांचे प्रशिक्षक, अभ्यासक्रम सहभागी आणि गुंतवणूकदार मात्र नफा नाही तर निव्वळ तोटा सहन करत होते.असं समोर आलं होतं.(Avdhoot Sathe)

अवधूत साठे नेमके कोण?

अवधूत साठे १९९१ पासून बाजारपेठेत सक्रिय आहेत. ते मध्य मुंबईतील दादर येथील एका साध्या चाळीत वाढले. नंतर ते त्यांच्या कुटुंबासह मुलुंड येथे स्थलांतरित झाले. त्यांच्याकडे अभियांत्रिकी पदवी आहे. साठे यांनी हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजमधून सॉफ्टवेअर उद्योगात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ते परदेशातही गेले आणि काही काळ अमेरिका, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी केली. २००८ मध्ये नोकरी सोडून त्यांनी फायनान्शिअर सल्लागार म्हणून प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला.

साठेंच्या युट्यूब चॅनलचे 9 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स

साठे हे त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे लाखो लोकांना शेअर बाजाराचे धडे देतात. त्यांचे यूट्यूब चॅनलचे 9 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. येथे ते शेअर बाजारातील रणनीती, चार्ट विश्लेषण आणि गुंतवणुकीच्या टिप्स देतात. त्यांच्या प्रशिक्षणामुळे अनेकांनी ट्रेडिंग सुरू केले, पण काही गुंतवणूकदारांनी त्यांच्या सल्ल्यांमुळे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. साठे यांच्या जाहिरातींमध्ये अवास्तव नफ्याच्या हमी दिल्याचाही दावा आहे.

Exit mobile version