कर्जदारांना दिलासा! RBI कडून व्याजदर कपात; रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय
repo rate सर्वसामान्यांना नवीन वर्षाची भेट म्हणून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गृह आणि कार कर्जाच्या ईएमआयमध्ये कपात केली.
Relief for borrowers RBI cuts interest rates; Decision to reduce repo rate by 0.25 percent : सर्वसामान्यांना नवीन वर्षाची भेट म्हणून, देशाच्या बँकिंग नियामक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गृह आणि कार कर्जाच्या ईएमआयमध्ये कपात केली आहे. आरबीआय एमपीसीने रेपो दरात (repo rate) 0.25% कपात करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे रेपो दर 5.25% पर्यंत खाली आला.
MLA Nilesh Rane : भाजप नेत्यांच्या कारमध्ये दीड लाख आढळताच निलेश राणे थेट पोलीस ठाण्यात अन्…
यापूर्वी, आरबीआयने फेब्रुवारी, एप्रिल आणि जूनमध्ये दर कपात केली होती. याचा अर्थ असा की चालू कॅलेंडर वर्षात, आरबीआयने तिच्या सहापैकी चार बैठकांमध्ये दर 1.25% ने कमी केला आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये, आरबीआयने (RBI) रेपो दर कायम ठेवला. दरम्यान, आरबीआयने तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे, ज्यामुळे येत्या काळात रेपो दरात (repo rate) आणखी कपात करण्याची शक्यता आहे.
नगरपरिषद अन् नगरपंचायतीच्या निकालावर आज होणार फैसला, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
याबाबत आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरामध्ये कापात झाल्याचं जाहीर केलं. त्यांनी आज शुक्रवारी 5 डिसेंबर 2025 रोजी नवे पतधोरण जाहीर केले. त्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली. आरबीआय एमपीसीने रेपो दरात 0.25% कपात करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे रेपो दर 5.25% पर्यंत खाली आला. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून या कपातीमुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या ईएमआयचा भार कमी होणार आहे.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण, न्यायालयाचा मोठा निर्णय; शीतल तेजवानीला 8 दिवस पोलीस कोठडी
दरम्यान 2025 या वर्षभरामध्ये आरबीआयने तीन वेळा रेपो रोट घटवला आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या कपातीनुसार रेपो रेट 1.25 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामध्ये फेब्रुवारीमध्ये रेपो रेट 6.50 वरून 6.25 टक्क्यांवर आला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर जूनमध्ये 0.50 टक्क्यांनी तर आता डिसेंबर आरबीआय एमपीसीने रेपो दरात 0.25% कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आतापर्यंतच्या कपातीनुसार रेपो रेट 1.25 टक्क्यांनी कमी झाला आहे.
