Download App

शेअर मार्केटमध्ये हाहाकार! उच्चांकानंतर सेन्सेक्स-निफ्टीची ‘आपटी’ने सुरुवात

शेअर मार्केटमध्ये आज आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवसात सेन्सेक्स 700 तर एनएसई निफ्टी 200 अंकांच्या घसरणीने उघडला.

Share Market Today : मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात चढ उतार (Share Market Today) सुरूच आहे. त्यामुळे सर्वसामान्य भागधारकांसह मोठ्या गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला लागला आहे. गुंतवणूक करावी की नको अशी स्थिती या वर्गात दिसून येत आहे. आज शुक्रवार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी विक्री तेजीत सुरू झाली सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह उघडले. दरम्यान, काल ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्सने प्रथमच 82 हजार अंकांचा टप्पा पार केला होता. निफ्टी सुद्धा 25 हजारच्या पुढे गेला होता. आज शुक्रवारी मात्र बीएसई सेन्सेक्स 700 अंकांनी कोसळला तसेच एनएसई निफ्टी देखील 200 पेक्षा जास्त घसरणीसह उघडला.

Share Market Crashed : सेन्सेक्स 1243 अंकांनी घसरला, जाणून घ्या बाजार कोसळण्याची कारणं

एनडीए सरकारचा तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (23 जुलै) सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला. (Stock Market). अर्थसंकल्प सादर होण्याआधी बाजारात सुरुवात वाढीने झाली होती. मात्र, काही वेळातच घसरण व्हायला लागली. यामध्ये सेनसेक्स 1000 अंकांनी घसरला होता. तर निफ्टीमध्ये 382 अंकांची घसरण झाली होती. तेव्हापासूनच शेअर मार्केटमध्ये जास्त चढ उतार दिसून येत आहे.

केंद्र सरकार अर्थसंकल्पात काय घोषणा (Union Budget 2024) करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अर्थमंत्री सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी कोणकोणत्या घटकांसाठी काय तरतूद केली याचाही विचार शेअर मार्केटमध्ये होतो. शेतकरी, महिला, रोजगार यांच्यासाठी अनेक घोषणा झालेल्या आहेत. उद्योग, सेवा, आयटी या क्षेत्रासाठी केंद्र सरकारने  (Budget 2024) तरतुदी केल्या आहेत. शेअर बाजारासाठी फारसं काही या बजेटमधून मिळालं नाही अशी भावना तयार झाली आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर अजूनही दिसून येत आहे.
निफ्टीमध्येही उदासिनता दिसली. आज सकाळच्या सुरुवातीच्या सत्रात निफ्टीमध्ये 200 पेक्षा जास्त अंकांची घसरण दिसून आली. तसेच सेन्सेक्समध्येही 700 अंकांची घसरण दिसून आली. सकाळच्या टप्प्यात अशी परिस्थिती दिसून येत आहे. आता दुपारपर्यंत यामध्ये बदल होईल. पुढे शेअर बाजारात काय परिस्थिती राहिल, शेअर बाजारात पुन्ही तेजी येणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
follow us