Shirdi LokSabha : बबनराव घोलप की भाऊसाहेब वाकचौरे; ठाकरेंसमोर आणखी एक मोठा पेच

Shirdi LokSabha constituency : माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb-Wakchaure) यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिर्डीचे राजकीय समीकरणे बदलेली आहेत. परंतु आता मंत्री बबनराव घोलपांच्या भूमिकेने आणखी एक राजकीय नाट्य सुरू झाले. या जागेवर नाशिकचे बबनराव घोलप (Babanrao-Gholap)आता दावा सांगू लागले आहेत. घोलप यांनी थेट मातोश्री गाठली. घोलपांबरोबर शिर्डीतील काही कार्यकर्ते होते. वाकचौरे […]

BABBARAO GHOLP AND WAKCHURE

BABBARAO GHOLP AND WAKCHURE

Shirdi LokSabha constituency : माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb-Wakchaure) यांनी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिर्डीचे राजकीय समीकरणे बदलेली आहेत. परंतु आता मंत्री बबनराव घोलपांच्या भूमिकेने आणखी एक राजकीय नाट्य सुरू झाले. या जागेवर नाशिकचे बबनराव घोलप (Babanrao-Gholap)आता दावा सांगू लागले आहेत. घोलप यांनी थेट मातोश्री गाठली. घोलपांबरोबर शिर्डीतील काही कार्यकर्ते होते. वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतल्यावर सर्वांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरून खडाजंगी झाल्याचे बोलले जात. महाविकास आघाडी असल्याने ही जागा कुणाच्या वाटेला येते. त्यावरून पेच आहे. ही जागा मिळविणे व तेथे आपला उमेदवार देणे, असा मोठा पेच आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर निर्माण झाली आहे.


कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीचाच, आमदार काळेंच्या दाव्याने कोल्हेंसमोर पेच

लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. इच्छूक उमेदवारांची संख्या वाढल्याने शिर्डी लोकसभेचे वातावरण तापू लागले आहे. शिर्डीत गेल्या तीन वेळा शिवसेनेचे खासदार निवडून आला आहे. गेल्या दोन टर्म खासदार राहिलेले सदाशिव लोखंडे हे पक्ष फुटीनंतर शिंदे गटात दाखल झाले आहेत. तर या मतदारसंघात तीनवेळेस शिवसेना विरुध्द काँग्रेस लढत झालेली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नेते या जागेवर दावा सांगत आहेत. त्यात पहिल्या टर्मला खासदार झालेले भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा मातोश्रीवर जावून शिवबंधन बांधले आहे. परंतु वाकचौरे यांना पक्षात घेण्यास काही शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला आहे. शिर्डीसाठी गद्दार नको, खुद्दार हवा अशी भूमिका घेतलेले आहे.

मोठी बातमी : वादग्रस्त IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी पुन्हा सेवेत; ठाकरे सरकारने केले होते निलंबित

शिर्डीतील काही शिवसैनिक पदाधिकारी, माजी मंत्री बबनराव घोलप हे सोमवारी दुपारी मातोश्रीवर दाखल झाले. तेथे शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा झाली. त्यावेळी वाकचौरे यांना पुन्हा पक्षात घेतल्याने अनेकांनी जोरदार नाराजी व्यक्त केली. त्यात वाद झाल्याचे वृत्त आहे.

बबनराव घोलपांची पुन्हा तयारी ?
बबनराव घोलप हे शिर्डी मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आता शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे व बबनराव घोलप यांच्यामध्ये जुंपली आहे. त्यावरून कार्यकर्त्यांमध्येही दोन गट पडल्याचे बोलले जात आहे. 2014 लाही बबनराव घोलप हे शिर्डीतून इच्छुक होते. त्यांना तिकीट मिळाले होते. त्याचवेळी त्यांना न्यायालयाने तीन वर्षांच्या शिक्षा सुनावली होती. पुढे तेथून सदाशिव लोखंडे यांनी खासदारकीची लॉटरी लागली होती. परंतु आता पुन्हा बबनराव घोलप हे तिकीट मागू लागले आहेत.

Exit mobile version