Sanjay Raut : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) द्यावच लागेल असे स्पष्ट सांगितले.
Sanjay Raut : ‘काही दिवसांनी डोक्यावर काळ्या टोप्या घालून फिरतील’; राऊतांचा शिंदेंना खोचक टोला
राऊत पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी जर आरक्षण देण्याचा शब्द दिला आहे तर ती मेहेरबानी नाही. शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यावच लागेल. नाहीतर महाराष्ट्र पेटेल. सरकारला आरक्षण द्यावच लागेल नाहीतर जनता भडकेल. भारतीय जनता पक्षाच्या सहवासात आल्यापासून खोटी शपथ घेण्याचे काम शिंदे करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहे. महाराष्ट्रातील भक्कम तडा देण्याचे काम करत आहे. शिंदे आता भाजपाच्या इशाऱ्यावर चालत आहेत. यांचा स्वतःचा काहीच आचार-विचार राहिलेला नाही. जे भाजप सांगत आहेत तेच ते करत आहेत. काही दिवसांनी डोक्यावर काळ्या टोप्या घालून फिरतील, असा टोला राऊत यांनी लगावला.
काही दिवसांनी काळ्या टोप्या घालून फिरतील
यांना स्वतःचा आचार-विचार काहीच नाही. जे भाजप सांगेल तेच. काही दिवसांनी हे डोक्यावर काळ्या टोप्या घालून फिरतील. शिंदे गटालाच भाजपात जावं लागेल. भाजप आमचा छळ करतंय सांगत जाहीर सभेत राजीनामा देणारे हे. आता भाजपनेच त्यांना मांडीवर घेतलं आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
Maratha Reservation : ‘आणखी थोडा वेळ द्या, अपेक्षितच निर्णय होईल’; महाजनांचं मराठा बांधवांना आवाहन
आता तुमची दातखीळ का बसली ?
महाराष्ट्रात हत्याकांड झाले नाही का? यांचं सरकार आल्यानंतर असा सवाल राऊत यांनी केला. पालघरचे हत्याकांड म्हणजे एक प्रकारचं विचार करून केलेलं कारस्थानच होतं. उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचं घडलेलं अपघाताचे प्रकरण वाढवण्यात आलं. त्यानंतर अनेक साधूंवरती हल्ले झाले, हत्याकांड झाले, त्यावर तुमची का दातखीळ बसली आहे, असा सवाल यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना केला.