Maratha Reservation : ‘आणखी थोडा वेळ द्या, अपेक्षितच निर्णय होईल’; महाजनांचं मराठा बांधवांना आवाहन

Maratha Reservation : ‘आणखी थोडा वेळ द्या, अपेक्षितच निर्णय होईल’; महाजनांचं मराठा बांधवांना आवाहन

Girish Mahajan Speak on Maratha Reservation : शाश्वत आणि टिकणारं आरक्षण हवं असेल तर आणखी थोडा वेळ द्यावा लागणार असल्याचं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांना केलं आहे. नाशिक दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Maratha Reservation : गद्दारी करण्याचा चान्स होता पण… जरांगेंचं चौंडीत भावनिक आवाहन

गिरीश महाजन म्हणाले, मराठा आरक्षण प्रकरणी मनोज जरांगे पाटलांनी अल्टिमेटम पूर्ण झाला आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

मराठा आरक्षण आंदोलन तापणार? शिंदे समितीला शासनाकडून ‘दोन’ महिन्यांची मुदतवाढ

समितीचं काम वेगाने सुरु असून ही समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आ,हे त्यामुळे मराठा आरक्षणासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, असं आवाहन मनोज जरांगेंना महाजन यांनी केलं आहे.

जातनिहाय जनगणनेची अजितदादांची मागणी रास्त पण…; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मराठा समाजाला शाश्वत आणि टिकणारं आरक्षण हवं असेल तर त्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागणार आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सरकार सकारात्मक आहे, मराठा समाजाला आरक्षण देईल तर हेच सरकार देईल.

मोदी सरकारच्या ‘त्या’ आदेशाचा काँग्रेसकडून कडाडून विरोध; खर्गेंनी थेट मोदींनाच पत्र धाडलं…

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं पण ते दुर्देवाने सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. जर आणखी थोडा वेळ मिळाला तर मराठा सामाजाला अपेक्षित असा निर्णय होणार असल्याचा विश्वासही गिरीष महाजन यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता. अनेक दिवस जरांगे पाटलांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केल्याचं पाहायला मिळालं.

जरांगे पाटील पुन्हा आक्रमक ; 24 ऑक्टोबरपासून ना अन्न ना पाणी!

तब्बल 16 दिवस हे आमरण सुरु होतं. अखेर सरकारने काही अटी मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं. त्यानंतर त्यांनी आजपर्यंतची मुदत सरकारला दिली होती. अखेर ही मुदत आता संपत आली असून मनोज जरांगे यांनी उद्यापासून आमरण उपोषण करणार असल्याचंही जरांगे यांनी जाहीर केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube