Sanjay Raut : मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक (Datta Dalvi Arrested) झाल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील वाद उफाळून आला आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर ठाकरे गटाचे नेते प्रचंड भडकले आहेत. काल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी शिंदे गटाला फैलावर घेतले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुलतान तर उपमुख्यमंत्र्यांना डेप्युटी सुलतानची उपमा दिली. राज्यातील शेतकरी अस्मानी संकटात सापडला असताना राज्यातले सुलतान, डेप्युटी सुलतान निवडणूक प्रचारात व्यस्त होते, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.
राज्यात नामर्दांचं सरकार
राऊत म्हणाले, दत्ता दळवी तुरुंगात आहेत. त्यांच्या घरी कुणी नाही. दोन चार षंढ आले आणि गाडीच्या काचा फोडून निघून गेले. ही त्यांची मर्दानगी. ते भाडोत्री गुंड अशा गोष्टी करण्यासाठी घेतात आणि गुंडगिरी चालवतात. ज्याने गाडी फोडली तो खरा मर्द असता तर त्यानं तिथं थांबायला पाहिजे होतं पळून काय जाताय?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. तिथे थांबले असते तर शिवसैनिकही तिथे आलेच असते. राज्यात नामर्दांचं सरकार चालू आहे, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.
Sanjay Raut : ‘आता एकनाथ शिंदेंवरच गुन्हा दाखल करा’ दळवींच्या अटकेवर राऊत भडकले
या राज्यात दोन कायदे. गद्दारांसाठी वेगळा कायदा असं असेल तर आधी तसं जाहीर करा. राज्यपालांना विचारतो आम्ही. ज्या शब्दामुळे दत्ता दळवींना अटक झाली तो शब्द चित्रपटात आहे. आनंद दिघेंच्या तोंडी तो शब्द सेन्सॉरने कापला का? तुम्ही त्यांचा अपमान करताय. पोलिसांवर दबाव असल्यानं जामीन प्रक्रियेत उशीर होतोय. हरकत नाही, शिवसैनिक तुरुंगात जाऊन मोडत नाहीत. आज अशी स्थिती आहे की हजार माराव्यात आणि एक मोजावं.
राजा नौटंकी, सरदारही नौटंकीच
राज्यात अवकाळी पाऊस कोसळतोय. विदर्भ, नाशिक, कोकण, ठाणे जिल्ह्यातही मोठं नुकसान झालं. हे संकट कोसळ असताना मुख्य सुलतान, डेप्युटी सुलतान प्रचारात व्यस्त होते. हे गेले नाही तर जशा काय निवडणुकाच थांबणार होत्या मुख्य जबाबदारी इथून खोके न्यायची होती. विधानसभा अधिवेशन होईल. प्रश्न निर्माण होतील, मग आज गेलेत सगळी नौटंकी आहे. पण राजाच नौटंकी आहे त्यांचे सरदार नौटंकीच असणार. काँग्रेस, एनसीपीचे नेते केव्हापासून गावागावात फिरतायत? पण मु्ख्यमंत्री व त्यांचे सरकार आज जागे झाले आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्याबाबतीत गंभीर परिस्थिती आहे. शेतकरी हवालदिल आहे. नाशकापासून नंदुरबारपर्यंत अशीच स्थिती आहे. द्राक्ष गेली, कापूस, फळबागा गेल्या सरकार कुठं आहे? अस्मानी संकट कोसळत असताना हे सुलतान प्रचारात छत्तीसगढ (Chhattisgarh Elections), हैदराबाद (Telangana Elections), जयपूर (Rajasthan Elections), निवडणूक पर्यटन सुरू आहे.
Girish Mahajan : ‘संजय राऊतांच्या डोक्याचा इलाज करा’; ‘त्या’ वक्तव्यावर महाजनांचा खोचक टोला