Download App

“देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे, लक्षात ठेवा…” ठाकरेंचा फडणवीसांना गर्भित इशारा

परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे व्हॉटसअप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्यावर बोललो नाही. आम्ही जर तुमच्या परिवरावर बोललो तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसन तुम्हाला झेपणार नाहीत, फक्त पडून राहावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, असा गर्भित इशारा देत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते दादर येथील शिवाजी नाट्य मंदिरात शाखाप्रमुखांना मार्गदर्शन करताना बोलत होते. (Shivsena (UBT) Uddhav Thackeray criticized DCM Devendra Fadnavis on Family)

काल बिहारची राजधानी पाटण्यामध्ये देशातील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, पाटण्यातील विरोधकांची बैठक मोदी हटावसाठी नसून परिवार बचाव बैठक आहे. सर्व परिवारवादी पक्ष एकत्र आले असून, या बैठकीचा मुख्य उद्देश आपला परिवार कसा वाचू शकेल आणि कशी सत्ता आपल्याकडे राहू शकेल हा आहे. एकत्रित आलेल्या सर्व पक्षांसाठी सत्तेत आल्यानंतर राज्य चालवणे म्हणजे धंदा असल्याचा थेट आरोपही फडणवीसांनी केला. फडणवीस यांच्या याच टीकेवर ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.

‘मी मुद्दाम मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो, भाजपला मिरच्या का झोंबल्या?’ ठाकरेंचा जळजळीत सवाल

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

काल मी बैठकीला गेलो होतो. त्यावर लगेच देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका. परिवार तुम्हाला सुद्धा आहे. तुमच्या परिवाराचे व्हॉटसअप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्यावर बोललो नाही. आम्ही जर तुमच्या परिवरावर बोललो तर तुम्हाला नुसतं शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसन तुम्हाला झेपणार नाहीत, फक्त पडून राहावं लागेल.

Nana Patole : फालतू भानगडीत पडण्यापेक्षा भाजपपासून सावध रहा; पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला

त्यामुळे परिवारावर बोलू नका. कारण मी माझ्या परिवारासाठी मी संवेदनशील आहे आणि प्रत्येकजण माझा परिवार आहे. सुरज सुद्धा माझा परिवारच आहे. सर्व शिवसैनिक माझा परिवार आहे, संपूर्ण महाराष्ट्र माझा परिवार आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरा कोणी घेत असेल तर तुमचं तुम्हाला माहिती, पण माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे. मी माझं कुटुंब जपणार आहे. हे माझं कुटुंब माझ्या सोबत आहे. त्यामुळे परिवार बचाव वगैरे बोलू नका. अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत, असा गर्भित इशारा ठाकरे यांनी फडणवीस यांना दिला.

Tags

follow us