‘मी मुद्दाम मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो, भाजपला मिरच्या का झोंबल्या?’ ठाकरेंचा जळजळीत सवाल

‘मी मुद्दाम मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो, भाजपला मिरच्या का झोंबल्या?’ ठाकरेंचा जळजळीत सवाल

Uddhav Thackeray : बिहारची राजधानी पाटण्यात काल (23 जून) विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनाच अचंबित करणारी घटना घडली. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चक्क जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारील खुर्चीवर बसल्याचे दिसले. या प्रकारारून भाजप नेत्यांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठविली. उद्धव ठाकरे हे मेहबूबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून युतीच्या चर्चा करत असल्याचे पाहून अचंबित झाल्याचा टोमणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. विरोधकांच्या या आरोपांना आज उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

पिंग-पोंग बॉल, फुगे अन् बर्फाचा वापर करुनही ‘टायटॅनिक’ अद्यापही समुद्रातच, वैज्ञानिक ठरले फेल…

शनिवारी मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.  ठाकरे म्हणाले, ‘काल मी बिहारला गेलो, बघितलं मेहबूबा मुफ्ती आहेत. मी मुद्दाम त्यांच्या बाजूला जाऊन बसलो. हो कारण आता काय भाजपच्या लाँड्रीतून स्वच्छ झालेले आहेत. त्या बाजूला बसलेत आणखी आजूबाजूचे स्वच्छ होतील. जो तुमच्याबरोबर गेला तो स्वच्छ. काल बेंबीच्या देठापासून बोंबलत होते देवेंद्र फडणवीस मग, आम्ही ज्यावेळी प्रश्न विचारले त्यावेळी मिरच्या का झोंबल्या तुम्हाला? आम्ही हिंदुत्व सोडलं, आम्ही हिंदुत्व सोडलं असं म्हणालात मग तुम्ही मेहबूबा मुफ्तींबरोबर गेलात त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे होतं. नाही ना सुटलं मग आमचं कसं सुटेल?. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही सोडणारही नाही पण, तुमच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही’, असा घणाघात ठाकरे यांनी केला.

‘काल मी मुफ्तींना मुद्दाम विचारलं. आम्ही काँग्रेससोबत गेलो तर आम्ही हिंदुत्व सोडलं असा आरोप केला जातो त्यावेळी आम्ही त्यांना तुमचं उदाहरण देतो. त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘हां मैने सुना है.’ ‘मी विचारलं ते निर्लज्ज आहेत तुमच्याबरोबर आले तुम्ही त्यांच्याबरोबर कसे गेलात?’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 370 कलम काढणार नाही म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं. आता  या गोष्टी भेटल्याशिवाय कळत नाहीत.’

विरोधकांच्या बैठकीत चार बडे नेते भिडले; पवार-ठाकरे म्हणाले “आमच्याकडून काहीतरी शिका”

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल :

सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर केली.

मेहबुबा मुफ्तीच्या शेजारी बसण्यावरून हल्लाबोल :

फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी शेजारी बसण्यावरून जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, मला आश्चर्य वाटतं की, सातत्याने मेहबुबा मुफ्ती यांच्या नावावर भाजपला नेमही टोमणे मारणारे उद्धव ठाकरे मुफ्ती यांच्यासोबत तर चाललेच आहे, पण आता तर ते थेट त्यांच्या बाजूलाच बसले आहेत. हा केविलवाणा प्रयत्न केवळ परिवारवादी पक्ष वाचण्यासाठी चालू असून यासाठी ही केलेली एकप्रकारची तडजोड असून, याचा कुठलाही परिणाम होईल असे वाटत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube