Download App

Crime : प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे करुन कुकरमध्ये शिजवले अन् मिक्सरमध्ये बारीक केले… : घटना ऐकून अंगावर शहारे

Murder Of Live in Partner :

काही दिवसांपूर्वी देशाची राजधानी दिल्लीतील दोन घटनांनी संपूर्ण देश हादरला होता. दिल्लीत आधी श्रद्धा वालकर आणि नंतर साक्षी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आता अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी आणि काळजाचा थरकाप उडवणाारी घटना मीरा रोडमध्ये (Meera Road) घडली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची निर्घृण आणि अमानवीय पद्धतीने हत्या केली आहे. आरोपीने प्रेयसीच्या मृतदेहाचे लहान लहान तुकडे करुन ते प्रेशर कुकरमध्ये शिजवून नाल्यात फेकल्याची माहिती आहे. पळून जाण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी (police) त्याला अटक केली. (Shocking incident in Meera Road; Kill the live-in partner and grind the body into pieces in a mixer)

मिळालेल्य माहितीनुसार, मीरा भाईंदर फ्लायओव्हरच्या शेजारी गीता आकाश दीप बिल्डिंग गीता नगर फेज-7, जे विंग फ्लॅट क्रमांक 704 मध्ये गेल्या तीन वर्षांपासून एक जोडपं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मनोज साने (वय 56 वर्षे) आणि सरस्वती वैद्य (वय 32) अशी या दोघांची नावं होती. हे जोडपं राहत असलेल्या सदनिकेतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्याच इमारतीत राहणाऱ्या शेजाऱ्यांनी नयानगर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती देऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आणि वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र नवकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळ गाठले. त्याचेवळी लिफ्टमधून पळून चाललेल्या मनोजला पोलिसांनी पकडले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दुर्गंधी येणाऱ्या घरात प्रवेश केला. त्यानंतर जे समोर आलं ते धक्कादायक होते. आरोपीने प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे केलेले पोलिसांना दिसले.

Jitendra Awhad ‘….तर एखाद्या जंगलामध्ये वणवा पेटावा तसा महाराष्ट्र पेटेल’; आव्हाडांनी व्यक्त केली चिंता

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पंखा आणि प्रेशर कुकरचा वापर करण्यात आला होता. आरोपी ते तुकडे प्रेशर कुकरध्ये टाकून शिजवायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करायचा. हे तुकडे तो एका पिशवीत भरून इमारतीच्या मागे असलेल्या नाल्यात फेकून  द्यायचा. यासाठी तो आापल्या दुचाकीचा वापर करायचा, अशी माहिती आहे.

दरम्यान, काल रात्री पोलिसांनी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून घरातून हत्येसाठी वापरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे. या हत्येप्रकरणी आरोपीविरुद्ध नयानगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून ही हत्या का करण्यात आली, याचा उलगडा तपासानंतरच होईल. हत्येच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Tags

follow us