Jitendra Awhad ‘….तर एखाद्या जंगलामध्ये वणवा पेटावा तसा महाराष्ट्र पेटेल’ : आव्हाडांचा गंभीर इशारा

Jitendra Awhad ‘….तर एखाद्या जंगलामध्ये वणवा पेटावा तसा महाराष्ट्र पेटेल’ : आव्हाडांचा गंभीर इशारा

Jitendra Awhad : शिवराज्यभिषेक (coronation) दिनाच्या दिवशी कोल्हापूरमध्येही काही तरुणांनी औरंगजेबचा (Aurangzeb) संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्यानं तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याविरोधात काल हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची (Kolhapur) हाक दिली होती. त्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी दगडफेक झाली. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कोल्हापुरात जे काही घडतंय, ते दु:खद आहे. हा पुरोगामी महाराष्ट्रचा पराभव आहे. धर्माचे राजकारण करत राहिलो तर महाराष्ट्रात वणवा पेटेल, असं ते म्हणाले. (On the issue of Kolhapur, Jitendra Awhad said, if religion continues to be politicized, fire will burn in Maharashtra)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या घटना घडत आहोत. राज्याच्या काही भागात दंगली उसळल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या फकीरवाडा भागात संदल उरोसदरम्यान औरंगजेबाचे फोटो घेऊन काही युवक नाचत होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूरमध्येही औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने हिंदूं संघटना आक्रमक झाल्या. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत लिहिलं की, कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांचे शहर आहे. अंबाबाईची नगरी म्हणजे कोल्हापूर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेत सर्वांत जास्त ज्यांचे विचार आले, ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ज्या कोल्हापूरच्या नगरीत भारतातील सर्वात जास्त ज्यांचे शाळा बांधल्या गेल्या, विविध जाती-धर्माच्या लोकांसाठी वसतिगृहे बांधली. ती पहिली भूमी होती जिथे बहुजनांना पूजेचा अधिकार दिला गेला. त्याच्यासाठी वैदिक विद्यालय उघडण्यात आलं. भारतात त्याकाळी सर्वात प्रगतीशील राज्य म्हणून कोल्हापूर ओळखले जात होतं.1920 च्या माणगाव परिषदेत मागासवर्गीयांना त्यांचा नेता मिळाला. बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी उभे होते.

Nilesh Lanke On Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना नीट करायला वेळ लागणार नाही, निलेश लंकेचा इशारा</a>

पुढं ते लिहिलात की, त्या कोल्हापुरात आता जे काही झालं ते अतिशय दुःखद आहे. आपण संख्येने अधिक आहोत, म्हणून अल्पसंख्याकांना कधीही मारू शकतो हा विचार अंगावर शहारे आणतो. कोणीही बोलायचे नाही, असं म्हटलं तर मग ज्या तत्वांवर आपण जगतो आहोत, त्या तत्वांशी गद्दारी करीत आहोत, असं होते. प्रत्येक वेळी मताचे राजकारण करायचे, प्रत्येक वेळी जातीचे राजकारण, प्रत्येक वेळी धर्माचे राजकारण, प्रत्येक वेळी धर्माचे राजकारण करतांना माझा धर्म, माझी जात या पलीकडे बघायचे नाही, असं जर ठरवले तर मला वाटते की, ज्या विचारांवर महाराष्ट्र उभा आहे; त्या विचारांचाच पराभव आहे, असं आव्हाड यांनी लिहिलं.

कोल्हापुरसारखी परिस्थिती महाराष्ट्रात कुठेही घडू नये, असा निर्धार प्रत्येक राजकारण्याने केला, तर ते अशक्य नाही. पण, केवळ मतांचे राजकारण करून सत्तेत कोण जाणार? आणि सत्तेत कसे जायचे? असा विचार करत बसलो तर एखाद्या जंगलामध्ये वणवा पेटावा तसे महाराष्ट्रात होईल आणि जसे जंगलातील प्राणी पळतात तशी माणसे पळतांना दिसतील, अशी चिंता आव्हाडांनी व्यक्त केली.

आपल्याला काय हवं, हे जनतेने आणि नेत्यांनी ठरवावं. पण, पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारसरणीला चिकटून राहिलो आणि कोणत्याही परिस्थितीत शंभर लोक समोर असतील आणि बाजून एक जण असेल आणि त्या एकावर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल; तर त्या एकाच्या बाजूने उभे राहिलो तर भीती वाटता कामा नये, इतका धीटपणा या मातीने आपल्याला शिकवला आहे. तो आता उघडपणे दाखवावा लागेल. अन्यथा हा महाराष्ट्र वैचारिक गदारोळात बेचिराख होईल. निवडणूका कोण जिंकणार? सत्तेवर कोण येणार? याची मला तरी पर्वा नाही. मला नक्कीच महाराष्ट्राची काळजी वाटते. त्यामुळेच सध्या महाराष्ट्रात जे काही वातावरण आहे, ते काही बरे नाही. झालेल्या घटनेबद्दल मनापासून दु:ख होत असल्याचं ते म्हणाले.

अंबाबाईच्या मंदिराजवळ बाबुजमाल नावाचा दर्गा आहे. या दर्ग्याच्या प्रवेशद्वारावर श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केल्याचे देशातील तसेच महाराष्ट्रातील किती जणांना माहीत आहे? हे असं आगळं-वेगळं कोल्हापूर. कोणीतरी एक व्यक्ती स्टेटस पोस्ट करतो आणि आपण सगळ्यांनाच बडवायला सुरूवात करतो. स्टेटस लावणारा देखील वेडा आणि मारणारेही वेडे. पण, समाज कधी शहाणा होणार? असा सवाल त्यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube