Nilesh Lanke On Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना नीट करायला वेळ लागणार नाही, निलेश लंकेचा इशारा

  • Written By: Published:
Nilesh Lanke On Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना नीट करायला वेळ लागणार नाही, निलेश लंकेचा इशारा

Nilesh Lanke On Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या घरातील लोकांवर टीका करत असतात. काल परवा पडळकरांनी शरद पवार(Sharad Pawar) यांचा सोलापुरात एकेरी उल्लेख केला होता. आता पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पडळकरांना नीट करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी बोलताना निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले पडळकरांचं खूप झालं आता. राष्ट्रवादीचे संस्कार आम्हाला थांबतात अन्यथा येथून मागेच त्यांना नीट केले असते. (Nilesh Lanke Criticize On Gopichand Padalka)

आमदार गोपीचंद पडळकर हे रविवारी रात्री उशिरा सोलापुरात आले होते.दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे धनगर समाजाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांचा छोटेखानी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आमदार गोपीचंद पडळकरांनी या छोटेखानी कार्यक्रमात शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत सडकून टीका केली.रोहित पवारांबाबत उल्लेख करताना ‘माकड’ म्हणत खिल्ली उडवली.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारने गेल्या वर्षी चौंडी येथे मस्ती केली, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती.

मायबाप तुम्हाला हात जोडून विनंती… दगडफेकीवर अन्सार चाचांचं आवाहन

निलेश लंके म्हणाले…

राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते खासदार शरद पवार यांच्या बद्दल एकेरी उल्लेख करून सध्या प्रसिद्धी मिळवण्याचा जो घाट सुरू आहे त्या लोकांना संस्कार शिबिरात पाठवण्याची गरज असून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना नीट करायला वेळ लागणार नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सूसंस्कृत पक्ष असल्यामुळे आम्ही शांत आहोत असं वक्तव्य नगर पारनेर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी केल आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना खा.शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता त्यावर आमदार लंके यांनी उत्तर दिले आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube