Download App

सिद्दीकी हे स्वप्न आणि प्रेमाने भरलेले जीवन जगले; निवडणूक रणनीतीकार अरोरा यांनी वाहिली श्रद्धांजली

नरेश अरोरा म्हणाले, सिद्दीकी हे स्वप्न आणि प्रेमाने भरलेले जीवन जगले. परवा मी आणि बाबा सिद्दीकी हे काल संध्याकाळी भेटून काही गोष्टींवर चर्चा करणार होतो.

  • Written By: Last Updated:

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि माजी मंत्री <strongबाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या झाली. राष्ट्रवादीसाठी हा एक धक्का होता. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांची भेट घेऊन सांत्वन केले. राजकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकार यांनी सिद्दीकी यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. तर राष्ट्रवादीचे (अजित पवार ) निवडणूक रणनीतीकार आणि डिझाइन बॉक्सचे सहसंस्थापक नरेश अरोरा यांनी शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

नरेश अरोरा म्हणाले, सिद्दीकी हे स्वप्न आणि प्रेमाने भरलेले जीवन जगले. परवा मी आणि बाबा सिद्दीकी हे काल संध्याकाळी भेटून काही गोष्टींवर चर्चा करणार होतो. पण नशिबात काही तरी वेगळेच होते. ज्यामुळे मला धक्का बसला,मी सुन्न झालो आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरा म्हणाले की, जेव्हा कोणी बाबा सिद्दीकीप्रमाणे निघून जातो, तेव्हा आपण त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर आश्चर्यचकित होतो. बाबा सिद्दीकी खूप लवकर गेले आहेत, परंतु ते स्वप्ने आणि प्रेमाने भरलेले जीवन जगत होते.

अरोरा यांनी एक हृदयस्पर्शी व्हिडिओ क्लिप देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये ते आणि बाबा सिद्दीकी निवडणुकीची रणनीती आणि राष्ट्रवादीच्या भविष्यातील योजनांबद्दल चर्चा करताना दिसत आहेत.

follow us