Download App

गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती ‘एसआयपी’लाच; जानेवारी ते जून एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला

गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती 'एसआयपी'लाच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. मे महिन्यात 'एसआयपी'द्वारे मोठी गुंतवणूक झाली होती.

  • Written By: Last Updated:

SIP Investment : जूनमध्ये म्युच्युअल फंडात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सच्या (एसआयपी) माध्यमातून होणारी गुंतवणूक नव्या उच्चांकावर पोहोचली. गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती ‘एसआयपी’लाच (SIP) असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मे महिन्यात ‘एसआयपी’द्वारे २०,९०४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. यामुळे या वर्षातील सहा महिन्यांतील ‘एसआयपी’द्वारे झालेल्या एकूण गुंतवणुकीने एक लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. (Investment ) जानेवारी ते जून या कालावधीत एकूण एक लाख १९ हजार कोटींचा टप्पा गाठला आहे. म्युच्युअल फंड्स असोसिएशन इन इंडियाने (अॅम्फी) आज प्रसिद्ध केलेल्या मासिक अहवालात ही माहिती दिली आहे.

चार टक्क्यांनी वाढ

इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जूनमध्ये ४०,६०८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मे महिन्यातील ३४,६९७ कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता जूनमध्ये ६० लाख ८९ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसंच, मे महिन्यातील ५८.६४ लाख कोटींच्या तुलनेत त्यात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. या महिन्यात एकूण १७ नव्या योजना दाखल करण्यात आल्या. त्याद्वारे १५,२२७ कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाल्याचं ‘अॅम्फी’च्या आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

ॲम्फी’चा अहवाल मराठवाड्यात भाजपला धक्क्यावर धक्के! आता नाराज माजी गृहराज्यमंत्र्यांनी दिला राजीनामा

सर्वाधिक योगदान सेक्टोरल किंवा थीमॅटिक फंडांनी दिले असून, नव्या नऊ सेक्टोरल फंडांद्वारे १२,९७४ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. जूनमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता २७.६८ लाख कोटींवर पोहोचली आहे. मे महिन्यात ती २५.३९ लाख कोटी रुपये होती. जूनमध्ये नोंदणी झालेल्या नव्या ‘एसआयपीं’ची संख्या ५५ लाख १२ हजार ९६२ वर गेली असून, ‘एसआयपी’ खात्यांमधील एकूण गुंतवणूक ८,९८,६६,९६२ रुपये झाली आहे, असे ‘ॲम्फी’च्या अहवालात म्हटले आहे.

ठळक वैशिष्ट्ये

follow us

संबंधित बातम्या