मोठी बातमी! सुमारे ६१ लाख SIP खाती बंद; काय आहेत कारणं?, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

  • Written By: Published:
मोठी बातमी! सुमारे ६१ लाख SIP खाती बंद; काय आहेत कारणं?, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

SIP Investment During Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होत आहे. (Market) डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमक्यांनंतर परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्रमी विक्री हे बाजारातील सततच्या उलथापालथीचे कारण आहे. परदेशी गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याअभावी बाजार मंदावला आहे.

Stock Market : शेअर बाजार डेंजर झोन मध्ये, तब्बल 28 वर्षांचा घसरणीचा रेकॉर्ड मोडला

काल मंगळवारी शेअर बाजारात किंचित वाढ दिसून आली. दलाल स्ट्रीट लाल झाल्याने गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, 61 लाख लोकांनी त्यांच्या एसआयपी बंद केल्या आहेत आणि काही लोक याबद्दल संभ्रमात आहेत. SIP आणि म्युच्युअल फंडात गुंतवणुकीबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊया.

शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अधिक सुरक्षित आहे, असे अनेकदा म्हटले जाते, तेही बऱ्याच अंशी खरे आहे. पण या बाजारातील घसरणीमुळे लोकांचा म्युच्युअल फंडावरील विश्वासही उडाला आहे. विशेषत: स्मॉल कॅप फंड आणि मिड कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी बाजाराला कलाटणी दिली आहे. यामागचे कारण म्हणजे जानेवारी 2025 मध्ये SIP स्टॉपपेज रेशोमध्ये वाढ झाली आहे. एसआयपी बंद करणाऱ्यांची संख्या 82.73% वाढली आहे. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांच्या तुलनेत एसआयपी बंद करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये एसआयपी बंद करणाऱ्यांची संख्या 61.33 लाख इतकी झाली आहे. हा आकडा डिसेंबरमध्ये 44.90 लाख होता. एडलवाईस म्युच्युअल फंडाच्या एमडी आणि सीईओ राधिका गुप्ता यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, मंदीच्या काळात गुंतवणूक करणे सर्वात फायदेशीर आहे, एसआयपीचे खरे फायदे दीर्घकालीन दिसतात.

त्यांचा असा विश्वास आहे की इतिहास असा आहे की बाजारातील मंदीच्या काळात गुंतवणूक करत राहिल्याने चांगला परतावा मिळतो. मंदीच्या काळात एसआयपी बंद करणे म्हणजे कमी किमतीत युनिट्स खरेदी न करणे, ज्यामुळे भविष्यातील नफा कमी होतो. मात्र, यातील सगळ्या गोष्टी वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक कराव्यात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube