एसआयपी बंद करण्याचा विचार करताय? मग ‘या’ पाच गोष्टी लक्षात घ्या, नाहीतर बसेल भुर्दंड

एसआयपी बंद करण्याचा विचार करताय? मग ‘या’ पाच गोष्टी लक्षात घ्या, नाहीतर बसेल भुर्दंड

SIP Investment End : शेअर बाजारात घसरण झाली की अनेक जण कोणताही विचार न करता एसआयपी बंद (SIP Investment End) करण्याचा निर्णय घेतात. यामुळे त्यांनी जमा केलेला फंड तर कमी होतोच शिवाय त्यांना जो नफा मिळणार होता तो देखील मिळत नाही. म्हणून मार्केटमध्ये (Share Market) घसरण झाली तरी एसआयपी बंद करण्याचा निर्णय कधीच घेऊ नका. जर तुम्ही असा निर्णय घेण्याचा विचार केलात तर आधी काय नुकसान होऊ शकते याचाही विचार करा.

मॅच्युरिटीच्या आधी एसआयपी बंद केल्यास कंपाऊंडिंगचा फायदा मिळत नाही. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर कंपाऊंडिंग म्हणजे चक्रवाढ व्याज असते. यामध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेच्या व्याजावर व्याज मिळते. अशा वेळी जर एखाद्या गुंतवणूकदाराने मुदत पूर्ण होण्याआधीच एसआयपी बंद केली तर कंपाऊंडिंगचा फायदा (Compounding Interest) मिळणे बंद होऊन जाते.

मार्केट बेनिफिट्स बंद

शेअर बाजार पडल्यानंतर अनेकजण एसआयपीमध्ये गुंतवणूक कमी करतात. पण जाणकार सांगतात की ज्यावेळी मार्केटमध्ये मंदी असेल मार्केट पडलेले असेल अशा वेळी शेअर बाजार असो किंवा एसआयपी गुंतवणुक वाढवली पाहिजे. कारण मार्केट पडल्यामुळे एसआयपीच्या पैशांत जास्त युनिट अलॉट होतात.

वृद्धापकाळात मिटेल पैशांचं टेन्शन; ‘या’ वयापासून सुरू करा एसआयपी गुंतवणूक

एसआयपीमध्ये टाळाटाळ करू नका

बऱ्याच वेळा असे होते की एकदा एसआयपी बंद केल्यानंतर पुन्हा सुरू करण्यास टाळाटाळ केली जाते. कमी पैशांच्या गुंतवणुकीतून मोठा फंड तयार करण्यासाठी एसआयपी सुरू केली जाते. ज्यावेळी एसआयपी बंद केली जाते त्यानंतर पुन्हा सुरू करण्यासाठी मात्र बहुतांश लोक टाळाटाळ करतात. पण असे करू नका. काही कारणास्तव जर तुम्ही एसआयपी बंद केली तरी कालांतराने आर्थिक गणित जुळवून पुन्हा एसआयपी सुरू करणे फायद्याचे ठरेल.

एकाच एसआयपीमध्ये गुंतवणूक नको

जर तुम्हाला एकूण पाच हजार रुपये एसआयपीमध्ये गुंतवायचे असतील तर तुम्ही एकाच एसआयपीमध्ये सगळे पैसे गुंतवणूक करू नका. किमान दोन ते तीन एसआयपीमध्ये गुंतवणूक करा. यामुळे तुम्हाला मिळणारा प्रॉफिटचा अॅव्हरेज जास्त राहील. तसेच दीर्घ काळात मिळणारा फायदा देखील जास्त राहील.

कशा पद्धतीने एसआयपी रोखाल

एसआयपी सातत्याने सुरू ठेवणे हाच चांगला पर्याय आहे. पण एखादे वेळी अचानक पैशांची गरज भासल्यास आणि दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसल्यास अशा वेळी काही गोष्टी लक्षात ठेवा की टारगेट एसआयपी रोखून पूर्ण करणे हाच एकमात्र पर्याय आहे.

‘टीबी’चा विळखा करा सैल! आरोग्य मंत्रालयाने सांगितली 10 लक्षणे; वाचा अन् उपाय अमलात आणाच..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube