वृद्धापकाळात मिटेल पैशांचं टेन्शन; ‘या’ वयापासून सुरू करा एसआयपी गुंतवणूक

वृद्धापकाळात मिटेल पैशांचं टेन्शन; ‘या’ वयापासून सुरू करा एसआयपी गुंतवणूक

SIP Investment Tips : म्युच्युअल फंड एसआयपीकडे लोकांचा (Mutual Fund SIP) जास्त कल आहे. या गुंतवणुकीत थोडी जोखीम आहे पण ठराविक कालावधीत थोडी थोडी रक्कम जमा करून याद्वारे मोठा फंड तयार होतो. एसआयपीमध्ये जितक्या जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते तितका जास्त फंड तयार करता येतो. त्यामुळे एसआयपीमध्ये (Systematic Investment Plan) जितक्या लवकर होईल तितक्या लवकर गुंतवणूक सुरू केली पाहिजे.

म्युच्युअल फंड एसआयपी पैसे गुंतवणूक करण्याचा एक चांगला मार्ग आहे. यामध्ये तुम्ही कमी पैशांनी सुरुवात करून दीर्घ काळात मोठा निधी तयार करु शकता. पण तुम्हाला माहिती आहे का की एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करण्याचे नेमके वय किती आहे? तुम्ही वयाच्या कोणत्या वर्षापासून एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकता? आज याच महत्वाच्या माहितीबाबत जाणून घेऊ या..

एसआयपी सामान्य गुंतवणूकदारांमध्ये जास्त लोकप्रिय आहे. एसआयपीमध्ये जर तुम्ही दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली तरच त्याचा तुम्हाला चांगला फायदा मिळू शकेल. आपल्याकडे साधारणपणे वयाच्या 21 ते 25 वर्षांपासून व्यक्ती पैसे कमावण्यास सुरुवात करतो. एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हेच वय सर्वात योग्य मानले जाते. कारण या वयात आर्थिक जबाबदारी कमी असते. त्यामुळे कोणत्याही अडचणीविना एसआयपीमध्ये गुंतवणूक करता येते.

आधी होम लोन क्लिअर कराल की SIP गुंतवणूक करताल? फायदा कशात, जाणून घ्या, सोपं गणित..

एसआयपीमध्ये पैशांची वाढ कशी होते

एसआयपीमध्ये कंपाऊंड इंटरेस्ट लागतो. यामुळे वेळेनुसार रकमेत वेगाने वाढ होत राहते. म्हणून तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू करताल तितका जास्त फायदा मिळेल. उदाहरणार्थ समजा तुम्ही 25 व्या वर्षापासून कमाई करण्यास सुरुवात केली आणि याच वेळेस एसआयपीमध्ये गुंतवणूकही सुरू केली. यावेळी तुम्ही जर दर महिन्याला दोन हजार रुपये एसआयपी गुंतवणुक करत असाल. ही गुंतवणूक 30 वर्षांपर्यंत केली तर यावर तुम्हाला अंदाजे 12 टक्के परतावा मिळाला. अशा परिस्थितीत 55 वर्षांनंतर तुम्हाला साधारण 61 लाख 61 हजार 946 रुपये मिळतील.

एसआयपी गुंतवणुकीतील फायदे

एसआयपीमध्ये कमी वय आणि कमी रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकता. यामुळे तुम्हाला गुंतवणुकीसाठी जास्त कालावधी मिळेल तसेच या कालावधीत मोठा निधी देखील तयार होईल. शेअर बाजारातील घसरणीच्या वेळी एसआयपीमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार एसआयपी सुद्धा बंद करण्याची चूक करतात. पण शेअर बाजारात घसरण सुरू असली तरी एसआयपी बंद करू नका.

म्युच्यूअल फंड ‘एसआयपी’त भूकंप! जानेवारीत तब्बल 61 लाख लोकांच्या गुंतवणुकीला ब्रेक; कारण काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube