सावधान! रिटर्न ऑफ प्रीमियम टर्म प्लॅन घेताय? फायदा कमी नुकसानच जास्त; वाचा सविस्तर..
![सावधान! रिटर्न ऑफ प्रीमियम टर्म प्लॅन घेताय? फायदा कमी नुकसानच जास्त; वाचा सविस्तर.. सावधान! रिटर्न ऑफ प्रीमियम टर्म प्लॅन घेताय? फायदा कमी नुकसानच जास्त; वाचा सविस्तर..](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2023/03/insurance-2_V_jpg--1280x720-4g.webp)
Term Insurance : आपल्या कुटुंबाच्या वित्तीय सुरक्षिततेसाठी विमा पॉलिसी घेणे (Insurance Policy) आज काळाची गरज बनली आहे. घरात एखादाच व्यक्ती कमावता असेल तर विम्याचे महत्त्व आणखी वाढते. परंतु जेव्हा विमा पॉलिसी खरेदी करण्याची वेळ येते त्यावेळी मात्र बरेच जण गोंधळून जातात. कोणती पॉलिसी खरेदी करावी हेच बहुदा समजत नाही. सद्यस्थितीत बरेच जण एंडोवमेंट पॉलिसी खरेदी करतात. यामध्ये विमधारकाचा अचानक मृत्यू झाल्यास किंवा एका ठराविक कालावधी नंतर मोठी रक्कम मिळते. हा काळ वीस वर्षांपर्यंत किंवा कमीत कमी पाच वर्षांपर्यंत असू शकतो.
आता टर्म इन्शुरन्सचे (Term Insurance) चलनही वाढू लागले आहे. यामध्ये विमा कंपन्या प्रीमियम वापसीचे प्रलोभन दाखवून रिटर्न ऑफ प्रीमियम टर्म प्लॅन विक्री (Return of Premium Term Plan) करत आहेत. चला तर मग जाणून घेऊ की रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅन नॉर्मल टर्म प्लॅन पेक्षा किती वेगळा आहे. कोणता टर्म प्लॅन घेतल्याने किती फायदा होऊ शकतो याचीही माहिती घेऊ या..
नॉर्मल टर्म प्लॅन म्हणजे काय
नॉर्मल आणि रिटर्न ऑफ प्रीमियम या दोन्ही टर्म प्लॅन मध्ये मृत्यूनंतर समान रक्कम मिळते. मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या रकमेत मात्र अंतर आहे. नॉर्मल टर्म प्लॅनमध्ये मॅच्युरिटी सारखी संकल्पना नाही. तर रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅनमध्ये तुम्ही जमा केलेले सर्व पैसे तुम्हाला परत मिळतात.
सुप्रीम कोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू, दरमहा ७२,०४० रुपये पगार, लगेच अर्ज करा
रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅनमधील अडचणी
मॅच्युरिटीनंतर पूर्ण रक्कम परत मिळण्याची ऑफर आकर्षक वाटू शकते. पण खरतर यात काहीतरी गडबड आहे. यामध्ये प्रीमियम खूप जास्त असतो. नॉर्मल टर्म प्लॅनच्या तुलनेत अडीच ते तीन पट जास्त प्रीमियम या प्लॅनमध्ये असतो. तसेच मॅच्युरिटीनंतर तुम्ही जमा केलेल्या रकमेव्यतिरिक्त कोणताही फायदा मिळत नाही. सर्व आकडेमोड केल्यानंतर फायदा कमी आणि नुकसान जास्त वाटते.
रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅनचे नुकसान
समजा तुमचे वय 30 वर्षे आहे. तुम्ही पुढील 30 वर्षांसाठी एक कोटी रुपयांचा टर्म कव्हर घेतला आहे. नॉर्मल टर्म प्लॅनचा प्रीमियम दरवर्षी 12 हजार 686 रुपये इतका राहिल. पण रिटर्न ऑफ प्रीमियममध्ये हा प्रीमियम 28 हजार 360 रुपये इतका राहिल. दोन्ही प्लॅनमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास 1 कोटी रुपये मिळतील. पण नॉर्मल प्लॅनच्या तुलनेत रिटर्न ऑफ प्रीमियम मध्ये जवळपास अडीच पट जास्त रक्कम द्यावी लागेल. म्हणजेच मॅच्युरिटीनंतर विमाधारकाला फक्त 8.54 लाख रुपये प्रीमियम परत मिळू शकेल.
SIP मध्ये जास्त फायदा राहिल
लक्षात घ्या की रिटर्न ऑफ प्रीमियम रकमेवर कोणतेही व्याज मिळणार नाही. म्हणजेच महागाई अॅडजेस्ट केल्यानंतर 30 वर्षानंतर विमाधारकाच्या 8.54 लाख रुपयांचे मूल्य 50 हजार रुपयांच्या आसपास राहिल. जर तुम्ही रिटर्न ऑफ प्रीमियम ऐवजी नॉर्मल टर्म प्लॅन घेतला आणि बाकी राहणाऱ्या 1300 दरमहा एसआयपी (SIP) केली तरीही तुम्ही फायद्यात राहताल. 30 वर्षानंतर 15 टक्क्यांच्या हिशोबाने तुम्हाला जवळपास 92 लाख रुपये मिळतील. तुमचा 7 ते 10 टक्के वार्षिक रिटर्न सुद्धा तुम्हाला वर्षाला 25 ते 50 लाखांपर्यंत परतावा देऊ शकतो.
कल्लाच! बड्स ब्लूटूथ शिवाय तर, हेडफोन वायरलेस होणार; सॅमसंगनं आणलेली भन्नाट टेक्नोलॉजी काय?