Download App

PM मोदींचे वर्षभरापूर्वी सुतोवाच अन् मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये ‘सहा’ हजार कोटींची घट

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुदत ठेवींमध्ये गेल्या एक ते दीड वर्षांमध्ये सहा हजार कोटींची घट झाल्याचे समोर आले आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात या ठेवींचा आकडा 92 हजार कोटींच्या घरात होता. मात्र आता हा आकडा 86 हजार कोटींच्या घरात आला आहे. या मुदतठेवींबाबतची माहिती ‘वॉचडॉग फाउंडेशन’ या संस्थेने मागवली होती. यातून ही माहिती समोर आली आहे. (Six thousand crores decrease in the fixed deposits of Mumbai Municipal Corporation in the last one and a half years)

मागील काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या मुदतठेवी देशभरात चर्चेचा विषय बनल्या होत्या. गतवर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनीही या मुदत ठेवींवर भाष्य केले होते. त्यानंतरच या राखीव निधीचा वापर पुढील काही दिवसांमध्ये पायाभूत विकासकामांसाठी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

Atal bridge : प्रंतप्रधान मोदींनी काढली शिंजो आबेंची आठवण, म्हणाले, ‘आम्ही दोघांनी मिळून….’

मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या मुदत ठेवी आहेत. सर्वाधिक व्याज देणाऱ्या विविध राष्ट्रीय बँकांमध्ये या ठेवी गुंतवण्यात आल्या आहेत. याच ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरातून पालिकेचा आस्थापना खर्च आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी दिली जातात. याशिवाय कोस्टल रोड आणि इतर दिर्घकाळ चालणाऱ्या पायाभूत कामांसाठी लागणारा निधी मुदतठेवींमधील राखीव निधीशी संलग्न केला आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

गतवर्षी जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना या मुदत ठेवींवर भाष्य केले होते. “मुंबईकडे पैश्यांची कमी नाही, मात्र जर तो पैसा बँकांच्या तिजोरीत पडून राहिला तर मुंबईचा विकास कसा होईल? मुंबईचा पैसा योग्य जागी वापरला जाईल, तेव्हाच प्रकल्पाद्वारे विकास होईल, असे मोदी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवीवर केंद्राचा डोळा असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या.

मुंबईतील मोदींच्या भाषणात काँग्रेसचं शरसंधान; विकासकामांवरून वाचला तक्रारींचा पाढा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मोदी यांच्या या वक्तव्याला उत्तर दिले होते. “मोदी जे बोलले ते भयानक आहे. भक्त अंध समजू शकतो पण गुरू सुध्दा? 2002 पर्यंत मुंबई मनपा तुटीत होती. तेव्हाचे आयुक्त सुबोधकुमार आणि आपल्या लोकांनी ती सशक्त केली. मनपाचे अनेक उपक्रम त्या ठेवींमधून होतात. कोस्टल रोड आपण विना-टोल देत आहोत. 30-40% रक्कम ही कामगारांसाठी आणि इतर कामांसाठी आहे. यांना मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटते, अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली होती.

follow us