Atal bridge : प्रंतप्रधान मोदींनी काढली शिंजो आबेंची आठवण, म्हणाले, ‘आम्ही दोघांनी मिळून….’

  • Written By: Published:
Atal bridge : प्रंतप्रधान मोदींनी काढली शिंजो आबेंची आठवण, म्हणाले, ‘आम्ही दोघांनी मिळून….’

PM Narendra Modi : मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी सागरी सेतू बांधण्याची संकल्पना अनेक वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती. अखेर आज ती प्रत्यक्षात आली आहे. अटल शिवडी-न्हावाशेवा पुलाचे (Atal Shivdi-Nhavasheva bridge) आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झालं आहे. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे (Shinzo Abe) यांची आठवण काढली. या प्रकल्पात त्यांचाही मोठा वाटा असल्याचं मोदींनी सांगितलं.

राजकारणात धर्म आणू नये, मात्र भाजपचे राजकारण धर्माच्या आधारावर; नाना पटोलेंचं टीकास्त्र 

मोदी म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आमच्या संकल्पाचं हे प्रमाण आहे की आम्ही भारताच्या विकासासाठी सुमद्राला देखील टक्कर देऊ शकतो. लाटांनाही चिरून पुढे जाऊ शकतो. कोरोनाच्या संकटातही मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोडचे काम पूर्ण होणं हे महत्त्वाचे आहे. आमच्यासाठी प्रत्येक प्रकल्प हे भारताच्या नवनिर्माणचं काम आहे, आम्ही अशा प्रत्येक प्रकल्पातून भारताच्या विकासासाठी काम करत आहोत.

प्रवास होणार वेगवान… अटल सेतूवरून प्रवास करण्यासाठी कोणत्या वाहनाला किती टोल? 

2014 च्या निवडणुकीपूर्वी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो, तेव्हा मी काही संकल्प केले होते, आज ते संकल्प पूर्ण होताना दिसत आहेत. अटल सेतू हा त्याचाच एक भाग आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात 33,000 कोटी रुपयांची कामाचं भूमिपूजन झालं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा डबल इंजिनचं सरकार तयार झालं होतं, तेव्हापासून सर्व मोठे प्रकल्प सुरू झाले आहेत. या प्रकल्पासाठी जपानने फार मदत केली. मी माझे प्रिय मित्र शिंजो आबे यांची आठवण जरून काढेन. कारण, आम्ही दोघांनी मिळून या प्रकल्पाचं स्वप्न पाहिलं होतं, जे आज प्रत्यक्षात उतरत आहेत, अशा शब्दात मोदींनी शिंजो आबे यांच्या आठवणींना काढल्या.

गेल्या 10 वर्षात भारत बदलला असल्याची चर्चा आहे. 10 वर्षांपूर्वी हजारो कोटींच्या घोटाळ्याची चर्चा होत होती, मात्र आता या प्रकल्पाची चर्चा होत आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अटल सेतूचे फोटो पाहून प्रत्येकाला अभिमान वाटतो. हे फोटो मंत्रमुग्ध करणारी आहेत. या सेतूच्या बांधकामात जेवढ्या वारयर आहेत, त्यात पृथ्वीला दोनवेळा प्रदक्षिणा घालून होते. 4 हावडा ब्रिज, 6 स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तयार होऊ शकले, एवढं बांधकाम साहित्य या सेतूसाठी वापण्यात आलं, असंही मोदी म्हणालेय

follow us
  • fb
  • instagram
  • youtube