Mumbai Marathi Couple Clash With Dominos Delivery Boy : मराठी बोलता (Mumbai News) येत नसल्यामुळे वाद झाल्याच्या अनेक घटना राज्यभरातून समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. सोमवारी रात्री (12 मे) भांडुप परिसरातील साई राधे नावाच्या इमारतीत असलेल्या डोमिनोज पिझ्झाच्या (Dominos Delivery Boy) एका ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला मराठी येत नसल्याने (Hindi Marathi Dispute) पिझ्झाचे पैसे देण्यास नकार दिलाय. भांडुप परिसरातील एका जोडप्याने एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयशी मराठीऐवजी हिंदीत बोलत असल्याने वाद घातल्याचा आरोप आहे.
वादादरम्यान, जोडप्याने डिलिव्हरी बॉयला पैसे देण्यास नकार (Video Viral) दिला. त्याने एक अट घातली की जर त्याला पैसे हवे असतील तर त्याला मराठी बोलावे लागेल. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुढील तीन दिवस अत्यंत महत्वाचे! गारपीट अन् वादळी पावसासह ‘शक्ती’ चक्रीवादळ… हवामान विभाग काय सांगतो?
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार ही घटना सोमवार 12 मे रोजी घडली. मुंबईतील भांडुप परिसरातील साई राधा नावाच्या इमारतीत राहणाऱ्या एका जोडप्याने डोमिनोजमधून पिझ्झा ऑर्डर केला. रोहित लावरे नावाचा एक तरुण हा ऑर्डर देण्यासाठी आला होता. पण जेव्हा त्या जोडप्याने त्याला मराठीत बोलण्यास सांगितले, तेव्हा त्याला धक्काच बसला. रोहितला नीट मराठी बोलता येत नसल्यामुळे या जोडप्याने त्याला पैसे देण्यास नकार दिल्याचा आरोप आहे.
डिलिव्हरी बॉयने ही संपूर्ण घटना त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली. व्हिडिओमध्ये तो म्हणताना दिसतोय की, मराठी बोलण्याची सक्ती केली का केली जातेय? यावर घरात उभी असलेली बाई म्हणते, इथे असेच आहे. यावर डिलिव्हरी बॉयने म्हटलं की, जर तुम्हाला हिंदी येत नसेल तर तुम्ही ऑर्डर करायला नको होते. यावर घरातील व्यक्ती म्हणते. जर तुम्हाला मराठी येत नसेल तर पैसे मिळणार नाहीत.
काका-पुतणे पुन्हा एकत्र? वारं फिरल्याची जाणीव अन् अजितदादांसोबत युतीच्या हालचाली… नेमकं घडतंय काय?
मिळालेल्या माहितीनुसार डिलिव्हरी बॉय रोहितला पैसे न घेताच परतावे लागले. परंतु, डोमिनोजकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मुंबई पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.
मुंबईतील डिलिव्हरी बॉयने ही संपूर्ण घटना त्याच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली आहे. या व्हिडिओमध्ये ग्राहक फक्त मराठीत बोलावे लागेल असे म्हणत असल्याचे दिसत आहे, त्यानंतर डिलिव्हरी बॉयला पैसे न घेता परत जावे लागले.