Download App

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची संपत्ती घटली, किती आहे श्रीकांत शिंदे यांचं उत्पन्न? वाचा सविस्तर

कल्याण लोकसभा मतदारसंघातून आज श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामध्ये त्यांनी आपली संपत्ती जाही केली आहे.

Shrikant Shinde Property : कल्याण लोकसभेबाबत गेली अनेक दिवसांपासून कुणाला तिकीट मिळेल याबाबत चर्चा सुरु होती. श्रीकांत शिंदे यांनी तिकीट मिळेल की नाही अशीही चर्चा या ठिकाणी होती. मात्र ही प्रतिक्षा संपली असून त्यांना उमेदवारी जाहीर झाली. (Kalyan Lok Sabha) शिंदे यांनी आज उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. यावेळी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तेव्हा जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्यामध्ये त्यांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे.

 

श्रीकांत शिंदे यांची किती आहे एकून संपत्ती

जंगम मालमत्ता

श्रीकांत शिंदे यांच्याकडे 4 कोटी 79 लाख 64 हजार 927

वृषाली श्रीकांत शिंदे यांच्याकडे 3 कोटी 35 लाख 43 हजार 885

एकूण जंगम मालमत्ता 8 कोटी 15 लाख 8 हजार 812

स्थावर मालमत्ता

श्रीकांत शिंदे 2 कोटी 71 लाख

पत्नी वृषाली श्रीकांत शिंदे 4 कोटी 76 लाख

एकून सहा कोटी 76 लाख इतकी आहे.

रोख रक्कम

श्रीकांत शिंदे 3 लाख 99 हजार

वृषाली श्रीकांत शिंदे 1 लाख 41 हजार 452 रुपये

एकूण 4 लाख 40 हजार 452 रुपये

जमीन

ठाणे, सातारा

घर – पाचपाखडी जिल्हा ठाणे, प्लॅट कळवा, ठाणे

सोनं-चांदी

श्रीकांत शिंदे, 360 ग्रॅम सोन, हिऱ्याची अंगठी (4 लाख 91 हजार) घड्याल (1 लाख 10 हजार)

वृषाली श्रीकांत शिदे हिऱ्याची अंगठी (7 लाख 56 हजार) चांदी 3 किलो 35 ग्रॅम

एकही गुन्हा नाही.

स्वत:ची गाडी नाही

एकूण मालमत्ता -14 कोटी 96 लाख

follow us