नालायक लोकांच्या हातात चुकून सत्ता गेली तर नवी मुंबईची वाट… गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदे टार्गेट

Ganesh Naik : या मूर्ख लोकांनी नवी मुंबईतील एफएसआय वाढवला आहे. त्याला जर नगरविकास विभागाने मंजुरी दिली तर नवी मुंबई पाण्याखाली जाईल.

  • Written By: Published:
Ganesh Naik on Eknath Shinde, Shrikant Shinde navi mumbai

Ganesh Naik on Eknath Shinde, Shrikant Shinde: भाजपचे मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. महायुतीमध्ये असून दोन्ही नेते एकमेंकांना भिडतायत. आता नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदे पिता-पुत्रांना पुन्हा टार्गेट केले आहे.


एफएसआय वाढविला तर नवी मुंबई पाण्याखाली जाईल

गणेश नाईकांनी शिंदे पिता-पुत्रावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, या मूर्ख लोकांनी नवी मुंबईतील एफएसआय वाढवला आहे. त्याला जर नगरविकास विभागाने मंजुरी दिली तर नवी मुंबई पाण्याखाली जाईल. नागरिकांना जिणे मुश्किल होईल, गाड्या जाणार नाहीत. मुंबईत झिरो पॉईंटने जरी एफएसआय वाढला तरी, मुंबईतील नागरिक हैराण होतात, चालायलाही जागा उरत नाही. आपल्याकडे दोनने वाढला तर काय होईल याचा विचार करा. ( Ganesh Naik on Eknath Shinde, Shrikant Shinde navi mumbai)

मातोश्री थरथर कापेल! उद्धव ठाकरेंची अन् माझी नार्को टेस्ट करा – रामदास कदमांचा गंभीर दावा


अनेक मित्र माझे मनी लाँड्रिंगवाले आहेत

यांना वाटेल ते करतात. पण पैसे आपल्याकडे आले पाहिजे अशी ही लोक आहेत. वाईट मार्गाने पैसा येतो, जो पैसा मनी लाँड्रिंगमधून येतो तो पैसा मला नको. ईडी लागेल, मनी लाँड्रिंगवाले येतील असा पैसा मला नको, अनेक मित्र माझे मनी लाँड्रिंगवाले आहेत आणि या नालायक लोकांच्या हातात चुकून सत्ता गेली तर नवी मुंबईची वाट लागल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही गणेश नाईक यांनी शिंदे पिता-पुत्रावर केली.

Video : आभार मानले अन् नंतर शालजोडीत मारली; फडणवीसांनी ठाकरेंना दिलेलं हजार रूपयांचे चॅलेंज


असाच विकास हवा तर या कंपन्या ठाण्याला न्या कुणी तुम्हाला रोखले ?

नवी मुंबईचे पाणी कुठं गेलं, मोरबे धरण बांधूनही पाणी मिळत नाही. बारवी धरणाचे 35 एमएलडी पाणी आम्हाला देणे आसताना ते मिळत नाही म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे त्यांनी लवकर बैठक घेऊन त्यावर तोडगा काढायचा सागितले आहे. अंबरनाथ, बदलापूरमध्ये कुर्ल्याच्या सगळ्या भंगार कंपन्या तिकडे नेल्यात. तिथले पाणी खराब झाले, सगळी वाट लावली, जर नवी मुंबईत जायचं असेल तर वळसा घालून यावे लागते, जर असाच विकास हवा तर या कंपन्या ठाण्याला न्या कुणी तुम्हाला रोखले, असा सवाल ही गणेश नाईकांनी केलाय.

follow us