मातोश्री थरथर कापेल! उद्धव ठाकरेंची अन् माझी नार्को टेस्ट करा – रामदास कदमांचा गंभीर दावा
शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Ramdas Kadam demands Uddhav Thackeray Narco Test : शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यानुसार, उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतरही दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृतदेह मातोश्रीवर ठेवला, त्यांच्या मृतदेहाचे ठसे घेतले. त्यानंतर आज रामदास कदम यांची पत्रकार परिषद पार पडली.
शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ
यावेळी बोलताना रामदास कदम यांनी (Ramdas Kadam)म्हटलं की, 54 वर्ष शिवसेनेत घालवलेला माणूस असं का बोलतोय? हिम्मत असेल तर ठाकरेंनी सांगावं- असं घडलंच नाही. दोन दिवस शिवसेना प्रमुखांच्या (Balasaheb Thackeray) बॉडीचा छळ उद्धव ठाकरेंनी केला. भुंकणाऱ्या कृत्रांकडे लक्ष देत नाही. उद्धव ठाकरेंनी याचं आत्मपरीक्षण करावं. हिम्मत असेल तर ठाकरेंनी स्वतः बोलावं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि माझी नार्को टेस्ट (Narco Test) करा, अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे.
ठाकरे वाघ नाहीत
यावेळी रामदास कदम यांनी म्हटलंय की, हाताचे ठसे घेऊन ठेवले, उद्धव ठाकरेंनी मला सांगितलं. मी जेव्हा तोंड उघडेल तेव्हा मातोश्री थरकाप करेल आणि कापेल, हदरा बसेल. बाळासाहेबांच्या सोबत दिवस काढलेत. बाळासाहेब ठाकरेंसोबत मी निष्ठेने दिवस काढले आहे. ठाकरे वाघ नाहीत, लांडगा आहेत. हे महाराष्ट्राला कळू द्या, अशी टीका देखील कदमांनी केली आहे. इतके दिवस मी बोललो नाही. मात्र, काल ओघात बोलून गेलो. शरद पवारांनाही मातोश्रीवरच्या मजल्यावर जाऊ दिले नाही, असा खळबळजनक दावा कदम यांनी केला.
माझ्या वक्त्यावर मी ठाम
माझ्या वक्त्यावर मी ठाम. बदलणार नाही, असं देखील रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय. बाळासाहेब ठाकरेंचे ठसे घेतले की नाही, हे तुम्ही तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा. अरे मिलिंद बाळासाहेबांच्या बॉडीला उद्धव का त्रास देतोय, असं शरद पवार मातोश्रीवर आल्यावर म्हटले होते.
उद्धव ठाकरे अडचणीत
वरिष्ठ पातळीवरून मी चौकशी करायला लावली, तर उद्धव ठाकरे अडचणीत येतील. हे मला करायला लावू नका. खोटं बोलला, तर मातोश्रीसमोर मी उपोषणाला बसेल असा इशारा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय. बाळासाहेबांचे निधन झाल्यावर ॲम्बुलन्समधून नेणार होतो. मात्र, ऐनवेळी मी आणि बाळ नांदगावकर यांनी निर्णय बदलला. बाळासाहेबांच्या मृत्युपत्राबाबत मी बोलेल, पण वेळ आल्यानंतर बोलेल असं देखील रामदास कदम म्हणाले आहेत.