Download App

मोठी बातमी: उद्धव ठाकरेंना धक्का, सुभाष देसाईंच्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा दिला आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा मुलगा भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज बाळासाहेब भवन येथे हा पक्ष प्रवेश संपन्न झाला.

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती सुभाष देसाई यांच्याच मुलाने शिंदे गटात पक्ष प्रवेश केल्याने ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे. सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले आहे. 2014 च्या भाजप-सेना युतीच्या काळात आणि महाविकास आघाडीमध्ये ते उद्योगमंत्री होते. त्यांचा विधान परिषदेतील कार्यकाल संपल्यानंतर त्यांना पुन्हा आमदारकी देण्यात आली नव्हती.

शिवसेनेत पक्ष प्रवेशाचं खुप आधीच वडिलांशी बोलणं झालेलं आहे. हे सरकार नवीन स्थापन झालं होतं तेव्हाच मी निर्णय घेतला होता. पाच दशकापासून वडील एका पक्षात काम करीत आहेत. माझा काही स्वतंत्र विचार आहे. इतर नेत्यांसोबत काम करु शकतो, असे भूषण देसाई यांनी सांगितले.

भूषण देसाई म्हणाले, बाळासाहेब हेच माझे दैवत आहेत. शिवसेना हा शब्द सोडून माझ्यासमोर दुसरे काही आले नाही. हिंदुत्वाचा विचार आणि राज्यासाठी साहेबांच स्वप्न होत तेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढं घेऊन जात आहेत. म्हणून त्यांच्यावर माझा विश्वास आहे. लहानपणापासून त्यांचे काम बघत आलो आहे. आता ते करत असलेलं काम पाहून प्रेरित झालो आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिंशी उभा राहण्याचा निर्णय घेतला.

Sheetal Mhatre Video : ‘त्या’ व्हिडीओची SIT कडून चौकशी, शीतल म्हात्रे यांना न्याय मिळणार?

बाळासाहेबांचे विचार आणि भूमिका लक्षात घेऊन भूषण देसाई यांनी सांगितले की मला तुमच्यासोबत काम करायचे आहे. काम करणाऱ्या लोकांसोबत राहायचा निर्णय भूषण देसाई यांनी देखील घेतला आहे. त्यांचे मी पक्षात स्वागत करतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

भूषण देसाई यांच्या पक्ष प्रवेशावर आदित्य ठाकरे म्हणाले की, भूषण देसाई यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. कोणाला वॉशिंगमशीन मध्ये जायचे असेल तर जाऊ शकतात. सुभाष देसाई शिवसेनेशी निष्ठावान आहेत. ते 24 तास पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी काम करतात.

Tags

follow us