Sheetal Mhatre Video : ‘त्या’ व्हिडीओची SIT कडून चौकशी, शीतल म्हात्रे यांना न्याय मिळणार?

  • Written By: Published:
Sheetal Mhatre Video : ‘त्या’ व्हिडीओची SIT कडून चौकशी, शीतल म्हात्रे यांना न्याय मिळणार?

Sheetal Mhatre : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांचा एका मॉर्फ केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. त्याविरोधात गुन्हा देखील झालेला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने आता गंभीर दखल घेतली आहे. शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांच्या या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी विशेष चौकशी पथकाकडून (SIT) चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली आहे.

एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत ही एसआयटी (SIT) गठीत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. त्यामुळे या प्रकरणाची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेतली गेल्याच दिसत आहे. आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे.

दरम्यान व्हायरल व्हिडीओवरून आज विधानसभेतही जोरदार हंगामा झाला. शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव व भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच ज्यांनी कोणी हा व्हिडीओ व्हायरल केला त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावरून राज्य सरकार या प्रकरणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं आहे.

शितल म्हात्रे म्हणाल्या, व्हिडीओ ‘मातोश्री’वरुन व्हायरल; ठाकरेंवर थेट आरोप

आतापर्यंत पाच जणांना अटक

आतापर्यंत या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी चार जण ठाकरे गटाचे तर एक जण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. याच प्रकरणात व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे.

साईनाथ दुर्गे हे आदित्य ठाकरे यांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात.याशिवाय ते मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचे माजी सदस्यही आहेत. याशिवाय पोलिसांकडून मातोश्री नावाचे फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube