रतन टाटांचा खास मित्र कोण? वयानं लहान कामात मात्र वाघ; जाणून घ्या, पुणेकर शांतनुचा किस्सा..

शांतनू नायडू एक असं नाव आहे जे रतन टाटा यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि सहायक आहेत.

Ratan Tata 5

Ratan Tata 5

Ratan Tata : जगप्रसिद्ध उद्योजक आणि उद्योग जगतातील मोठं नाव रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांचं नाव, त्यांचं कार्य, त्यांची समाजसेवा या गोष्टी भारतीयांना चांगल्याच ठाऊक आहेत. घरातल्या मीठापासून ते अगदी हवेतल्या विमानापर्यंत प्रत्येक क्षेत्रात टाटांच नाव आहे. टाटांचं उत्पादन म्हटलं की फसवणूक नाहीच इतका विश्वास टाटांनी कमावला. कर्मचाऱ्यांच्या सुखदुःखात रतन टाटा कायमच पुढे असायचे. कर्मचऱ्यांच्या कल्याणासाठी जितकं करता येईल तितकं काम त्यांनी केलं. कोट्यावधी माणसं जोडली. टाटांचे  मित्र म्हणूनही काही नावं ओळखली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का की रतन टाटा यांचा सर्वात जवळचा मित्र कोण?

शांतनू नायडू एक असं नाव आहे जे रतन टाटा यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि सहायक आहेत. एक सामाजिक कार्यकर्ता, पशुप्रेमी, लेखक आणि युवा उद्योजकाच्या रुपात शांतनूने समाजात सकारात्मक बदल घडवण्याचं काम केलं. त्याची कहाणी इतरांना नक्कीच प्रेरणादायक आहे. त्याच्या यशाच्या गोष्टीत मैत्री, समाजसेवा आणि व्यापार विश्वाचे नवे पैलू उलगडतात.

सन 1993 मध्ये पुण्यातील एका तेलुगु कुटुंबात शांतनुचा जन्म झाला. शांतनू त्याच्या वयाच्या मुलांपेक्षा नेहमीच वेगळा राहिला. आज अवघ्या 32 वर्षांच्या वयातच उद्योग विश्वात शांतनुने वेगळी ओळख निर्माण केली आहे. शांतनू नायडू व्यापारात यशस्वी आहेच शिवाय समाजाबद्दल त्याची संवेदनशीलता त्याला इतरांपासून वेगळं करते. पशुप्रेम आणि समाजसेवेबद्दल त्याची प्रचंड ओढ आहे. यामुळेच त्याने मोटोपॉज नावाची संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून प्राण्यांची मदत केली जाते. तरीही रतन टाटा आणि 32 वर्षांच्या शांतनू नायडू यांच्यात इतकी जीवलग मैत्री कशी झाली असा प्रश्न राहतोच. याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू या..

Video : आता ‘रतन टाटा उद्योग रत्न पुरस्कार’; राज्य सरकारची मोठी घोषणा

अशी झाली रतन टाटा अन् शांतनुची भेट

शांतनुच्या मोटोपॉज या संस्थेने रस्त्यावर फिरणाऱ्या श्वानांसाठी खास डेनिम कॉलर तयार केले. यावर रिफ्लेक्टर लावण्यात आले होते. भरधाव वेगातील वाहनांपासून त्यांचं संरक्षण व्हावं हा उद्देश यामागे होता. शांतनुच्या या अनोख्या आयडीयाकडे रतन टाटांचं लक्ष वेधलं गेलं. मग काय टाटांनी शांतनुला लागलीच मुंबईला बोलावून घेतलं. इथूनच दोघांत घट्ट मैत्री झाली. शांतनू आता रतन टाटा यांच्या कार्यालयात जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. नव्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीबाबत सल्लाही शांतनू देतो. याचबरोबर शांतनू सोशल मिडिया इन्फ्लूएंसर आणि लेखकही आहे.

पुणेकर शांतनुचं शिक्षण..

शांतनू नायडूचा जन्म १९९३ मध्ये पुण्यातील एका तेलुगू कुटुंबात झाला. शांतनूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी आणि कॉर्नेल जॉन्सन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. टाटा एल्क्सीमध्ये ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनिअर म्हणून त्याने करिअरची सुरुवात केली. त्याने भटक्या श्वानांसाठी बनवलेल्या एका डिव्हाईसमुळे त्याची अन् रतन टाटा यांची भेट झाली होती.

शांतनुचा पगार अन् संपत्ती तरी किती

शांतनू नायडूच्या यश अनेकांसाठी प्रेरणादायक आहे. शांतनुला टाटांच्या कंपनीत नेमका किती पगार मिळतो याची निश्चित माहिती नाही. परंतु, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार शांतनू नायडूची एकूण संपत्ती पाच ते सहा कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्याच्या या उत्पन्नात टाटांबरोबर काम, मोटोपॉजच्या माध्यमातून समाजसेवा आणि त्यांच्या ऑनलाइन संवादातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे.

उद्योगविश्वाचा ध्रुवतारा निखळला! ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

शांतनू प्रत्येक रविवारी त्यांच्या “On Your Sparks” वर लाइव्ह सेशन्स करतात. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एंटरप्रेन्योरशीपबाबत माहिती देतात. यासाठी प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याकडून 500 रुपये फी घेतली जाते.

शांतनुचा प्रोजेक्ट, रतन टाटांशी मैत्री

शांतनू नायडूचा एक महत्वाचा प्रोजेक्ट आहे. गुडफेलो असे या प्रोजेक्टचे नाव आहे. हा एक स्टार्टअप आहे. या माध्यमातून वयोवृद्ध नागरिकांना युवकांशी जोडण्याचे व्यासपीठ उपलब्ध होते. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन कामकाजात मदत करणं हा या अॅपचा उद्देश आहे. शांतनू नायडूने त्यांच्या “I Came Upon a Lighthouse” या पुस्तकात रतन टाटांबरोबर मैत्री कशी झाली याबाबत सविस्तर लिहिलं आहे.

 

Exit mobile version