सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर पहिला हार मीच घालीन; खासदार सुप्रिया सुळेंनी थेट सांगितलं

Supriya Sule-महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार आणि परिक्षातील गोंधळ आता राज्यात वाढत चालला आहे. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे प्रकरणं अतिशय गंभीर आहे.

ेेSupriya Sule

ेेSupriya Sule

Supriya Sule On Sunetra Pawar CM post: बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) युवा नेते जय पवार (Jay Pawar ) यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या भविष्यातील राजकारणाबाबत एक मोठे विधान केले आहे. सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटते 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उमेदवार असतील आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असे जय पवार म्हटले आहे. त्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी कोल्हापूरमध्ये याबाबत एक मोठे विधान केले आहे. सुनेत्रा पवार वहिनी जर या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या, तर त्यांना पहिला हार मीच घालेन, असे सुळे म्हटल्यात. महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार आणि परिक्षातील गोंधळ आता राज्यात वाढत चालला आहे. मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की हे प्रकरणं अतिशय गंभीर आहे. अशा गोष्टीत आम्ही राजकारण आणणार नाही. महिला सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची जबाबदारी असते. भ्रष्टाचारमुक्त भारत व्हावा हे मोदींचे स्वप्न होते. महाराष्ट्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप-प्रत्यारोपांना यांना महाराष्ट्रात कोणी वाली आहे का ? मुख्यमंत्र्यांनी खतपाणी घालू नये, अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्राने फार विश्वासाने महायुतीला जनादेश दिला आहे. भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी दिलेला नाही, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केलीय.

महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहेत. अवकाळी पाऊस पडत आहे. सरसकट कर्जमाफी करू, असा शब्द सरकारने दिला होता; मात्र ती अद्याप झालेली नाही. भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आता कसं जगायचं? सरकारला या शेतकऱ्यांबद्दल आस्था नाही का? कांदा, दूध आणि इतर उत्पादकांच्या बाबतीत सरकारची भूमिका शेतकरीविरोधी आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलाय.

गोकुळमध्ये काहीतरी चुकीचं दिसलं असेल म्हणून प्रशासक नेमला असेल-सुप्रिया सुळे
गोकुळमध्ये मुख्यमंत्र्यांनी राजकारण आणले आहे का, हे मला माहिती नाही. गोकुळमध्ये काहीतरी चुकीचं दिसलं असेल, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी प्रशासक नेमला असावा. गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर मुख्यमंत्र्यांनी हसन मुश्रीफ यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करू नये. आणखी एखादी केस मुख्यमंत्र्यांच्या “वॉशिंग मशीन”मध्ये जाऊन साफ होणार असेल आणि यात सर्वसामान्य शेतकरी भरडला जात असेल, तर ते आम्ही होऊ देणार नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Exit mobile version