Threat email : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या राजीनाम्याची मागणी करत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि एचडीएफसी बँकेला (HDFC Bank) धमकीचे ईमेल (Threat email) पाठवल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. या तिघांना गुजरातमधील वडोदरा येथून पकडण्यात आले. एका व्यक्तीची ओळख आदिल रफिग अशी आहे, तर दुसरा त्याचा नातेवाईक आणि तिसरा व्यक्ती त्याचा मित्र आहे.
धमकीच्या ईमेल मागील त्यांचा हेतू जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी करत आहेत. याशिवाय ईमेल पाठवण्यासाठी वापरण्यात आलेले उपकरण शोधले जात आहे. आरबीआय, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांना धमकीचे मेल पाठवण्यात आले होते. त्या मेलमधून त्यांच्या कार्यालयांवर हल्ला करण्याची आणि निर्मला सीतारामन आणि आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
Mumbai : RBI सह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवलेत; धमकी देत सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी
दरम्यान, मुंबईत 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक मेल आला होता. त्यामध्ये काल (26 डिसेंबर) दुपारी दीड वाजता बॉम्ब ब्लास्ट होतील, असे म्हटले होते. यामध्ये खिलाफत इंडिया (Khilafat India) हे ईमेल अकाउंट वापरले होते. यानंतर पोलिसांनी या अनेक ठिकाणी शोधमोहीम केली होती. पण काहीही आक्षेपार्ह आढळून आलं नव्हतं. त्यानंतर एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरबीआयच्या ऑफिशियल मेलवर बाँब ठेवल्याची धमकी देणारा मेल आला होता. त्यानंतर आरबीआय कार्यालयाने पोलिसांना याची माहिती दिली होती. मुंबई पोलिसांनी त्यांच्या बाँब स्कॉडच्या मदतीने शोध घेतला होता. पण त्यामध्ये काहीही आढळलं नव्हतं. पण हा मेल कुठून करण्यात आला आहे आणि त्याचा उद्देश काय आहे याचा तपास पोलिसांनी सुरु केला होता.