Torres Ponzi Scheme : कोट्यवधी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने प्लॅटिनम हर्नचे सीईओ तौसिफ रियाझ यांना अटक केलीयं. प्लॅटिनम हर्न ही वादग्रस्त दागिन्यांच्या ब्रँड ‘टोरेस ज्वेलरी’मागील कंपनी आहे ज्यावर 1,000 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे. लाखो मुंबईकरांची टोरेस घोटाळ्याद्वारे फसवणूक करण्यात आली. या घोटाळ्याची व्याप्ती जवळपास 1 हजार कोटी रुपयांची असण्याची शक्यता आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केलीयं. टोरेस प्रकरणातील कथित घोटाळ्यावरील 182 पानांचा अहवाल मिळाल्याचं माध्यमांनी वृत्त दिलंय. ज्यामध्ये या प्रकारच्या 2019 मधील यूक्रेन आणि रशियातील B2B ज्वेलरी घोटाळ्यात असणाऱ्या लोकांनी टोरेस फसवणूक रॅकेट चालवल्याचा दावा केलायं.
खोडा घालणाऱ्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, कोस्टलवरून फडणवीस-शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोलa>
मुंबई, नवी मुंबई, मीरा रोड, सानपाडा येथील लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक टोरेस घोटाळ्यात झाली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. आर्थिक गुन्हे शाखा देखील या अहवालातील दाव्यांची तपासणी करत आहे. तौसिफ रियाजनं या प्रकरणाची माहिती यंत्रणाकंडे दिल्याची माहिती आहे. हे प्रकरण उघडकीस आणण्याचा सातत्यानं प्रयत्न केला असल्यानं त्याच्या जिवाला धोका असल्याचा दावा अटक केलेल्या तौसिफ रियाजनं केला. टोरेस ज्वेलरी बिझनेसच्या आडून पाँझी योजना राबवली जाते, अशी माहिती यंत्रणांना दिली होती. ज्यामध्ये कर चोरी, अतिरिक्त खर्च आणि मनी लाँडरिंग सारख्या गैर प्रकाराचा समावेश होता, असा दावा तौसिफ रियाजनं यंत्रणांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.
टोरेस स्कॅम B2B ज्वेलरी यूक्रेन आणि कैनकी ज्लेवरी (तुर्की) स्कॅमच्या योजनेच्या स्ट्रक्चर प्रमाण त्या लोकांकडून चालवलं जात होतं. तौसिफ रियाजनं ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि आगामी काळातील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी इन्कम टॅक्स, वित्तीय आणि दुसऱ्या यंत्रणांकडे तात्काळ हस्तक्षेपाची मागणी केली आहे. नवी मुंबई, मुंबई तसेच परिसरातील अन्य 5 ठिकाणी शाखा टोरेस कंपनीने लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केल्या नंतर एपीएमसी मधील टोरेस कंपनी कार्यालयावर कारवाई करण्यात आली. कार्यालयाचा पंचनामा करीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण जवळपास 1 कोटी 90 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरचा ऐवज हा तुर्भेतील टोरेस कार्यालयाच्या तळमजल्यात असलेल्या लॉकरमध्ये जमा करून ठेवला होता.
एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा एक धक्का; आता जालन्यातील मोठा नेता फोडत पालिका, झेडपीचे रणशिंग फुंकले
टोरेस घोटाळा प्रकरणानंतर सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या भागातील गुंतवणूक घोटाळा किंवा गुंतवणूक फसवणुकीच्या योजनांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय टोरेस घाटाळा प्रकरणी सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या भागात झालेल्या गुंतवणूक घोटाळ्यांची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यालयात पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात जी कारवाई बाकी असेल ती पूर्ण करण्यात यावी, अशा देखील सूचना दिल्या आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्लॅटिनम हर्न प्रायवेट लिमिटेड कंपनीनं दादरमध्ये टोरेस ज्वेलरी नावानं कार्यालय उघडलं होतं. त्यानंतर पाँझी स्कीम सुरु करुन गुंतवणूकदारांना प्रत्येक आठवड्याला 4 ते 10 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, कंपनीनं सुरुवातीला पैसे दिले त्यानंतर पैसे मिळणं बंद झालं अन् कंपनी गायब झाली.
Video: आता सर्वस्वी तुम्हीच; फडणवीसांना ट्रॅपमध्ये अडकवत जरांगेंची उपोषणाच्या पहिल्याच दिवशी तोफ
नेमका स्कॅम काय?
टोरेस ज्वेलर्सचे मुंबई आणि परिसरात एकूण सहा आलिशान शोरूम होते. दादर, ग्रँट रोड, कांदिवली,सानपाडा, मीरा रोड, कल्याण येथे कंपनीची शोरुम आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये कंपनीची सुरुवात झाली. मुंबईत या कंपनीची शोरुम उघडण्यात आल्याने लोकांना विश्वास बसला. तसेच आठवड्यात परतावा मिळत असल्याने सुरुवातीला हप्ते वेळेवर जमा होत असल्याने लोकांनी आशेने अधिकाधिक रक्कम या कंपनीत गुंतवली,त्यानंतर कंपनीला परतावा देणे शक्य न झाल्याने कंपनीने गाशा गुंडाळला. या प्रकरणात आर्थिक लुबाडणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी या कंपनीने नेमके काय आमीष दाखविले याची माहिती दिली आहे. टोरेसने सुरुवातीला मोठ्या शहरात आपले सेमिनार घेतले. त्यातून गुंतवणूकदारांना भल्यामोठ्या परताव्याचे आमीष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले.